खूप ताकद लावूनसुद्धा केक कापला गेला नाही, व्हिडीओ तर बघा!
बऱ्याचदा आपण वाढदिवसाला क्रीम आणि ब्रेडने तयार केलेला केक खाल्ला असेल, परंतु आपण कधी असा वाढदिवसाचा केक पाहिला आहे का जो चाकूने कापयला गेलं तरी कापला जात नाही?
जेव्हा जेव्हा एखाद्या मित्राचा वाढदिवस असतो तेव्हा लोक खूप मजेदार पद्धतीने सेलिब्रेट करतात. कधी कधी काही लोक गंमतीने असे काही करतात जे त्यांना वर्षानुवर्षे आठवत राहते. मित्राच्या वाढदिवसाला लोक मिळून असा व्हिडिओ बनवतात ज्याची कुणाला अपेक्षाही नसते. बऱ्याचदा आपण वाढदिवसाला क्रीम आणि ब्रेडने तयार केलेला केक खाल्ला असेल, परंतु आपण कधी असा वाढदिवसाचा केक पाहिला आहे का जो चाकूने कापयला गेलं तरी कापला जात नाही? होय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
वाढदिवसानिमित्त मित्रांनी अनोख्या पद्धतीने तयार केला केक
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाढदिवसाच्या निमित्ताने काही मित्रांनी मिळून वाढदिवसाचा केक तयार केला होता. मात्र, हा केक कुठल्याही ब्रेडपासून तयार करण्यात आलेला नाही किंवा कुठल्याही मिठाईच्या दुकानातून मागवण्यात आलेला नाही. त्याच्या अनेक मित्रांनी मिळून चाकूने न कापता येणारा केक बनवला. आता तुम्ही विचार करत असाल की असा कोणता केक आहे जो चाकूने कापला जाऊ शकत नाही? खरं तर त्या व्यक्तीचे मित्र त्याच्या वाढदिवशी त्याच्यासोबत मस्करी करत होते त्यांनी एक अॅल्युमिनियमचे भांडे घेऊन ते उलटे फिरवले आणि त्याला अगदी केकसारखे बनवले. हे बघताना असं वाटतं की हा खरोखरच केक आहे.
View this post on Instagram
हा केक त्या व्यक्तीच्या मित्राकडे नेताच, सर्व मित्रांनी रस्त्याच्या मधोमध एक टेबल ठेवले आणि त्याला केक कापायला सांगितले. त्याने केक कापण्याचा प्रयत्न करताच त्याने केक कापला गेलाच नाही. त्यानी एकदा-दोनदा प्रयत्न केले, पण तसे झाले नाही. यानंतर त्याला केकच्या जागी आणखी काही तरी असल्याचा संशय त्याला आला. त्याने केक उचलला तेव्हा तो एक ते एक भांडे असल्याचे आढळले. त्याने ते भांडे जसे उलटे केले ते पातेले निघाले. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 7700 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.