स्वत:च्या ड्रायव्हरच्या लग्नात खुद्द भाजप आमदाराने चालवली गाडी; सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुक

एका भाजप आमदाराने चक्क आपल्या ड्रायव्हरच्या लग्नात त्याला मंडपात घेऊन जाण्साठी स्वत: गाडी चालवली. हा व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

स्वत:च्या ड्रायव्हरच्या लग्नात खुद्द भाजप आमदाराने चालवली गाडी; सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुक
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 4:59 PM

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र दिसत आहे. मतदानापूर्वी जवळपास सर्वच राजकीयमंडळींनी जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. आता कोणी जनतेचं मन जिंकलं हे निकालामध्ये स्पष्ट होईलच. पण एक असा आमदार आहे ज्याने त्याच्या कृतीमुळे खरोखरच जनतेच्या मनात आतापासूनच घर केलं. भाजप आमदाराने आपल्या ड्रायव्हरच्या लग्नात चक्क स्वत: नवरदेवाची गाडी चालवली.

ड्रायव्हरच्या लग्नात आमदाराने चालवली गाडी

भाजप आमादार ड्रायव्हरच्या लग्नात नवरदेवाला मंडपापर्यंत स्वत: गाडी चालवत त्याला घेऊ आले. या आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्वत:च्या ड्रायव्हरच्या लग्नात या आमदार असं काही करतील असा ड्रायव्हरनेही कधीच विचार केला नसेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तर या आमदाराबद्दल अजूनच चर्चा होऊ लागली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. या भाजप आमदाराचे नाव गणेश चौहान आहे. संत कबीरनगर जिल्ह्यातील धनघाटा विधानसभा मतदारसंघातील हे आमदार आहेत.व्हिडीओमध्ये आमदार कार चालवत असून नवरदेव त्यांच्या बाजूला बसलेला दिसत आहे. नवरदेव विपिन मौर्य हा त्यांचा ड्रायव्हर आहे.

विपीन मौर्य लग्न होते, नवरदेव सजून-धजून जेव्हा लग्नाच्या मिरवणुकीत निघण्यासाठी सज्ज झाला, तेव्हा त्याची गाडी स्वतः आमदार गणेश चौहान चालवतील असे त्यांना वाटले नव्हते. गणेश चौहान गाडीच्या स्टेअरिंग सीटवर बसले आणि मंडपापर्यंत गाडी वळवली.

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक आमदाराचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या ड्रायव्हरच्या लग्नाचा आहे. ड्रायव्हरच्या लग्नात आमदाराने असे काही केले की त्यांच्या ड्रायव्हरने कधीच विचार केला नसेल

सोशल मीडियावर आमदाराचे कौतुक

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्याच्या साधेपणाचे आणि सहजतेचे कौतुक करत आहेत. माणसाला माणूस म्हणून वागवले पाहिजे असे काही लोक म्हणतात. काही लोक स्वतःला राजा समजू लागतात असं म्हणत गणेश चौहान यांच्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षावर होताना दिसत आहे. नेटकऱ्यांकडून भरभरून कमेंट्स आलेल्या पाहयाल मिळत आहेत.

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, तो चांगला सारथी आहे. एकाने लिहिले की भावना काहीही असो, उपक्रम चांगला आहे.असं म्हणत आमदार गणेश चौहान यांचे,कौतुक केलं जातं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.