‘सबका बदला लेगा रे तेरा एलन, सबका Blue Tick रिमुव्ह करेगा एलन…’, सोशल मीडियावर ब्लू टिक ट्रेंडिंग

ट्विटरच्या कारवाईनंतर अमिताभ बच्चन, विराट कोहली, शाहरुख खान, सलमान खान, सीएम योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्लू टिक काढताच मजेशीर मीम्सचा वर्षावही झाला आहे.

'सबका बदला लेगा रे तेरा एलन, सबका Blue Tick रिमुव्ह करेगा एलन...', सोशल मीडियावर ब्लू टिक ट्रेंडिंग
Elon musk blue tick verified accountsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 2:01 PM

मुंबई: सकाळपासून ट्विटर नुसता गोंधळ सुरु आहे. लोक उठतायत आणि ट्विटरवर जाऊन कुणाचं ब्लू टिक तसंच आहे आणि कुणाचं ब्लू टिक रिमूव्ह झालंय हे बघतायत. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी अखेर काही निर्णयांनंतर व्हेरिफाइड अकाऊंटवरून ब्लू टिक काढून टाकली आहे. ट्विटरवर अशी खाती होती ज्यांना सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाली. ट्विटरच्या कारवाईनंतर अमिताभ बच्चन, विराट कोहली, शाहरुख खान, सलमान खान, सीएम योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक बड्या सेलिब्रिटींच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्लू टिक काढताच मजेशीर मीम्सचा वर्षावही झाला आहे.

ट्विटरच्या या कृतीमुळे अनेक सेलिब्रेटींनी आपली ब्लू टिक गमावली असली तरी सर्वसामान्य युजर्स आता त्याचा जोरदार आनंद घेत आहेत. मायक्रो ब्लॉगिंग साइटवर हॅशटॅग #BlueTick युजर्सच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. मजेशीर मीम्सच्या माध्यमातून ब्लू टिक गमावलेल्यांची अवस्था लोक सांगत आहेत. चला तर मग पाहूया निवडक मीम्स.

ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकरांसह इतर क्षेत्रातील सेलिब्रिटींना व्हेरिफाइड अकाऊंट सेवा पुरवत होतं. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. पण एलन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले आहेत. यात ब्लू टिक पेड सर्व्हिसचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, आता कोणीही पैसे देऊन ब्लू टिक खरेदी करू शकतो.

एकेकाळी ट्विटरवर व्हेरिफाइड अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टला खूप महत्त्व होतं. पण ट्विटरच्या नव्या सब्सक्रिप्शन मॉडेलनंतर आता खूप कमी फॉलोअर्स असणारे युजर्सही ब्लू टिकचा दावा करू शकतात. भारतात ब्लू टिक सब्सक्रिप्शन 650 रुपयांपासून सुरू होणारे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.