आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो

आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केली आहे. व दत्तात्रय लोहार यांनी मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो
आनंद महिंद्रा यांनी दिली बोलेरो
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 10:08 PM

शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली : सांगलीच्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टा पायी जुगाड करत त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे (Mini Gypsy) देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी चक्क बोलेरो (Bolero) देतो असे ट्विट केले. आणि आज महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केली आहे. व दत्तात्रय लोहार यांनी मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत. यावेळी बोलेरो गाडीचे पूजन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर या मिनी जिप्सीचा बोलबाला होता. हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांच्याकडे पोहोचल्यावर, त्या व्हिडिओला ट्विट करत बोलेरोच्या बदल्यात मिनी जिप्सी अशी ऑफर दिली होती. तीच ऑफर कायम ठेवत त्यांनी दिलेले आश्वासन पाळले आहे.

थोडक्या खर्चात बनवली मिनी जिप्सी

दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे.आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रय यांनी गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. दत्तात्रय लोहार यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. ते कामही त्यांनी फॅब्रिकेशन दुकानात बघून शिकले आहेत. मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. नेते मंडळीपासून सर्वांनी या मिनी जिप्सीत फेरफटाका मारत त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.

जिप्सीवर गाणीही बनली

दक्षिण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार सरुताई धडे यांनी दत्तात्रय लोहार तयार केलेल्या मिनी जिप्सीवर गाणं तयार केले आहे. गाडी पॉम पॉम, गाडी पॉम पॉम, कशी वाजते मोटार, या गाडीला दत्ताभाऊ डायवर. असे गाणे त्यांनी यावर रचले आहे. त्यामुळे ही जीप्सी आणि हे गाणं पुन्हा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट देऊन गाडीचा फेरफटका मारत दत्तात्रय लोहार याचे कौतुक केले होते, त्यामुळे परिसरात याच जिप्सीची हवा आहे.

Video : डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा अल्लु अर्जुनच्या गाण्यावर भन्नाट डान्स, कमेंट करत अल्लु अर्जुन म्हणाला…

Video : भारताच्या ‘या’ युवकानं पुश-अप्सचा केला नवा विश्वविक्रम, मोडला स्वत:चाच रेकॉर्ड

Video : ‘जोर का झटका जोरों से लगा’; विचार करून स्टंट करा, नाहीतर ‘असं’ तोंडावर आपटावं लागतं!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.