Video: हृदयविकाराचा झटका येण्याची हास्यास्पद थेअरी, जॉन अब्राहमचा व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, ‘जॉन बाबा की जय हो!’
व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये कपिल शर्मा शोच्या सेटवरील आहे, जिथं जॉन आणि दिव्या खोसला कुमार त्यांच्या सत्यमेव जयते 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. या व्हिडिओमध्ये जॉन हार्ट अटॅकचे कारण सांगताना दिसत आहे.
बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे नेहमी स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात अभिनेता जॉन अब्राहमचाही समावेश आहे. वृद्धत्व असूनही स्वत:ला कसे तंदुरुस्त ठेवावे याविषयी त्यांच्या निरोगी जीवनशैलीतून प्रेरणा मिळते. त्याचे जिम करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण सध्या त्याची अशीच एक व्हिडीओ क्लिप इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये तो काहीतरी नवीनच शोध सांगताना दिसत आहे, जो ऐकल्यानंतर नेटकरी आता त्याची खिल्ली उडवत आहेत. ( Bollywood Actor John Abraham bizarre explanation of heart attack causes video viral people post funny comment)
व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये कपिल शर्मा शोच्या सेटवरील आहे, जिथं जॉन आणि दिव्या खोसला कुमार त्यांच्या सत्यमेव जयते 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. या व्हिडिओमध्ये जॉन हार्ट अटॅकचे कारण सांगताना दिसत आहे. ताणतणाव आणि खराब आहार हृदयासाठी कसा घातक आहे, याबद्दल त्यांने सांगितलं आहे. यादरम्यान त्यांनी ट्रायग्लिसराइड्सची तुलना पाण्यावर येणाऱ्या बुडबुड्यांशी केली.
पाहा व्हिडीओ:
I wish our medical students had this much confidence!!! Gibberish at all level!!! pic.twitter.com/eOfFI5FUm0
— Prerna Chettri (@prernachettri) December 8, 2021
आता जॉनची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल होताच, लोक सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवत आहेत. प्रेरणा छेत्री नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये इतका आत्मविश्वास असता तर! हा नुस्ता बकवास आहे!!!’
41 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 69 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 3,800 हून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. हृदयविकाराच्या झटक्याबाबत जॉनच्या या विचित्र विधानानंतर लोकांनीही आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘सगळे जण इतकं मन लावून त्याचं ऐकत आहेत, जणू तो जगप्रसिद्ध डॉक्टर आहे’.
हेही पाहा: