तत्काळ तिकीट बुकिंग करताय? ही ट्रिक वापरा आणि कन्फर्म सीट मिळवणं होईल सोपं!
तुम्हालाही अचानक प्रवासाची वेळ आली आहे का? तिकीट मिळवायचं म्हणून तत्काळ बुकिंग केलंत, पण तरीही सीट वेटिंगवर गेली? मग टेन्शन घेऊ नका! आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही कन्फर्म सीट मिळवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. बरंचसं यश हे फक्त चाणाक्षपणा आणि वेळेच्या नियोजनावर अवलंबून असतं! चला तर मग जाणून घेऊया या स्मार्ट ट्रिक्स

भारतीय रेल्वे ही देशाची लोकांच्या प्रवासाची मुख्य साथ आहे. लाखो प्रवासी रोज रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात. तिकीट बुकिंगसाठी अनेक वेळा प्लॅन करून ठरवलेलं असतं, पण काही वेळा अचानकच प्रवासाची गरज भासते आणि मग तत्काळ तिकीट बुकण्याशिवाय पर्याय उरत नाही.
पण तत्काळ बुकिंग म्हणजेच ‘रनिंग’मध्ये स्पर्धा! कारण हजारो लोक एकाच वेळी वेबसाइटवर तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न करत असतात, आणि कधी कधी आपल्या नशिबी वेटिंग लिस्टच येते. अशा वेळी काही स्मार्ट ट्रिक्स तुमच्या कामाला येऊ शकतात.
तत्काळ बुक करण्यासाठी काही खास टिप्स:
1. मास्टर लिस्ट आधी तयार ठेवा : तुम्हाला जेव्हा प्रवास करायचं असतं, तेव्हा आयआरसीटीसी वेबसाइटवर आधीच मास्टर लिस्ट तयार ठेवा. म्हणजे तुम्हाला तिकीट बुक करताना प्रत्येक प्रवाशाचं नाव आणि डिटेल्स भरत बसावं लागत नाही. फक्त नाव निवडा आणि माहिती आपोआप भरली जाईल. यामुळे वेळ वाचतो आणि तिकीट पटकन बुक होण्याची शक्यता वाढते.
2. पेमेंटसाठी वॉलेटचा वापर करा : तत्काळ बुकिंगमध्ये ‘पेमेंटचा’ वेळ खूप महत्त्वाचा असतो. जितक्या लवकर पेमेंट पूर्ण होईल, तितकी तुमच्या कन्फर्म सीटची शक्यता वाढेल. यासाठी आयआरसीटीसी वॉलेटमध्ये आधीच पैसे टाकून ठेवा. यामुळे कार्ड डिटेल्स भरण्याची गरज पडत नाही आणि थेट पेमेंट पूर्ण करता येतं.
3. वेळेआधी लॉगिन करा : जास्तीत जास्त लोक 10 वाजता (एसी साठी) किंवा 11 वाजता (स्लीपर साठी) लॉगिन करतात, पण तुम्ही थोडं पुढचं पाऊल टाका! 5 मिनिटं आधी, म्हणजे 9:55 किंवा 10:55 वाजता लॉगिन करून तयार राहा. बुकिंग सुरू होताच फक्त प्रवासाची माहिती टाका आणि पेमेंट करा. हा वेळच तुमचं तिकीट निश्चित करू शकतो!
तिकीट बुक करताना काय महत्त्वाचं आहे ?
तत्काळ तिकीट बुकिंग ही खूप वेगवान स्पर्धा आहे. तुमचं इंटरनेट जितकं जलद असेल, तुमचा प्लॅन तितका यशस्वी होण्याची शक्यता जास्त! मास्टर लिस्ट, वॉलेट आणि वेळेपूर्वी लॉगिन हे छोटे पण उपयोगी उपाय आहेत.
आता पुढच्या वेळी तत्काळ बुकिंग करताना ही ट्रिक वापरून पाहा आणि तुमचं तिकीट कन्फर्म झालं की नक्की स्मितहास्य येईल!