दारु पिऊन मध्यरात्री २ ला त्याने बॉसला मेसेज केला, हा मेसेज व्हायरल होतोय

आयुष्यात फक्त बॉस चांगला पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण एक टीम यशस्वी होण्यामागे प्रत्येक व्यक्तीचा जसा महत्त्वाचा वाटा असतो त्यापेक्षा जास्त वाटा हा बॉसचा असतो. त्यामुळे बॉस नेहमी त्यापदाला साजेसा असा हवा.

दारु पिऊन मध्यरात्री २ ला त्याने बॉसला मेसेज केला, हा मेसेज व्हायरल होतोय
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 11:06 PM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : सोशल मीडियावर सध्या एका चॅटचा स्क्रिनशॉट चांगलाच व्हायरल होतोय. अनेकजण या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या चॅटमधील महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे कंपनी चांगली नसली तरी चालेल, पण बॉस चांगला हवा. या वक्तव्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. ट्विटरवर एका युजरने संबंधित स्क्रिनशॉट शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एक कर्मचारी आपल्या बॉसला रात्रीच्या दोन वाजता दारुच्या नशेत मेसेज करतो. विशेष म्हणजे तो आपल्या मेसेजमध्ये बॉसचे आभार मानत आहे. त्याच्या मेसेजचा स्क्रिनशॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आयुष्यात फक्त बॉस चांगला पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण एक टीम यशस्वी होण्यामागे प्रत्येक व्यक्तीचा जसा महत्त्वाचा वाटा असतो त्यापेक्षा जास्त वाटा हा बॉसचा असतो. त्यामुळे बॉस नेहमी त्यापदाला साजेसा असा हवा. बॉसला अनेक गोष्टींना सामोरं जायचं असतं. बॉसवर मोठी जबाबदारी असते. कामाचं ओझं तर असतं त्याचबरोबर टीममधील प्रत्येकासोबत बॉसचं वैयक्तिक नातं असणं जास्त महत्त्वाचं असतं.

बॉसचं आपल्या सहकाऱ्यांशी मैत्रीचं आणि सौहार्दाचं नातं असेल तर ती टीम खूप यशस्वी होती. तसेच एक यशस्वी टीम निर्माण व्हायला खूप वेळ लागतो. कारण टीममध्ये वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि मनस्थिती असलेली लोकं असतात. या सर्व माणसं एकमेकांशी संवाद साधून आणि सहवासातून जवळ येतात. त्यांच्या भावनिक ओलावा निर्माण होतो. या सगळ्या दरम्यान बॉसने सुद्धा त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणं जास्त गरजेचं असतं. यामुळे बॉस आपल्या सहकाऱ्यांच्या जवळचा बनतो आणि बॉसचं देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत भावनिक नातं निर्माण होतं.

सोशल मीडियावर सध्या जो चॅटचा फोटो व्हायरल होतोय त्यामध्ये एक कर्मचारी आपल्या बॉसचे आभार मानतोय. तो मेसेजमध्ये आपण दारु प्यायलो आहोत, असं आधी सांगतो. त्यानंतर तो आपलं मन मोकळं करतो. “बॉस मी दारु प्यायलो आहे. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. मला सातत्याने काम करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल धन्यवाद. एकवेळ चांगली कंपनी नसेल तरी चालेल, पण मॅनेजर चांगला असायला हवा. त्याबाबतीत मी नशिबवान आहे. त्यामुळे स्वत:चंही कौतुक माना”, असं मेसेज कर्मचाऱ्याने आपल्या बॉसला केला आहे.

ट्विटरवर सिद्धांत नावाच्या व्यक्तीने संबंधित चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहे. दारु पिवून एखाद्या माजी कर्मचाऱ्याने आपल्याला मेसेज केलेला आपण समजू शकतो. पण अशाप्रकारचा मेसेज तुम्ही कधी पाहिलाय का? असा सवाल करत सिद्धांत यांनी हा फोटो शेअर केलाय. त्यांच्या या फोटोवर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. संबंधित स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर सिद्धांत यांनी आणखी एक ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी संबंधित फोटो हा खरा असल्याचं म्हटलं आहे.

“मित्रांनो, मी एका कंपनीत इंजिनिअर्सच्या टीमचं नेतृत्व करतो. आमच्या 13 जणांची एक टीम आहे. माझ्या कंपनीचं नाव OI असं आहे. मी OI मधील पहिला टेक माणूस आहे आणि मी ही टीम सुरुवातीपासून तयार केली आहे. आम्हाला आमच्या वर्क कल्चरचा आणि आम्ही करत असलेल्या कामाचा अभिमान आहे. ही टीम गेल्या दोन वर्षांपासून दररोज माझ्यासोबत खूप जवळून काम करत आहे आणि ज्या व्यक्तीने मला हे मेसेज पाठवले आहेत तो मी आजवर पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अभियंत्यांपैकी एक आहे”, असं सिद्धांत म्हणाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.