बोर्डाच्या परीक्षेत 500 मुलींमध्ये एकटा मुलगा, बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल, त्याची काकू म्हणाली
अभ्यास झालेला नसतो, परीक्षा असते, केंद्र कुठलं, वर्ग कुठचा, पर्यवेक्षक कोण असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर! त्यात असं काही घडलं जे पाहायची आपल्याला अजिबातच सवय नाही तर?
बोर्डाची परीक्षा म्हणलं की विद्यार्थी आधीच टेन्शन मध्ये असतात. अभ्यास झालेला नसतो, परीक्षा असते, केंद्र कुठलं, वर्ग कुठचा, पर्यवेक्षक कोण असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर! त्यात असं काही घडलं जे पाहायची आपल्याला अजिबातच सवय नाही तर? आधीच स्वतःला सांभाळणारे विद्यार्थी अशा वेळी पुरते गोंधळून जातात. परीक्षेचा माहोलच वेगळा, ते टेन्शनच वेगळं नाही? असंच एका मुलासोबत घडलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी ही घटना. एका मुलाने खूप मुली एकसाथ पाहिल्या आणि भावाला चक्करच आली. होय ही खरी घटना आहे.
बिहार इंटरमीडिएट परीक्षा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. विद्यार्थी त्यांच्या केंद्रावर जाऊन परीक्षा देतायत. याच ठिकाणाहून एक बातमी येतेय, “नालंदा में परीक्षा केंद्र पर एक उम्मीदवार बेहोश हो गया।” याचे कारण मुली होत्या. होय!
आपल्या परीक्षा केंद्रात 500 मुली पाहून मनीष शंकर बेशुद्ध झाला. मनीषच्या वर्गात तो वगळता सगळ्या मुली होत्या. या 500 मुली पाहून तो बेशुद्ध पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले
मनीष शंकर अल्लम इक्बाल असं या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याचे केंद्र बिहार शरीफ येथील ब्रिलियंट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते. जेव्हा मनीष परीक्षा केंद्रावर पोहचला, 500 मुली बघून त्याची अवस्था वाईट झाली. तो अस्वस्थ झाला.
एक लड़के को 500 लड़कियों के बीच बैठा दिया गया, नर्वस होकर गिर गया बेचारा. अस्पताल में भर्ती है.
यह मामला बिहार के नालंदा जिले का है. 12वीं की परीक्षा देने गया था लड़का. वीडियो क्रेडिट- @kumarprakash4u Reporter- अमृतेश pic.twitter.com/u8EJagOSsc
— Bikram Singh (@bikramsamvad) February 1, 2023
या सेंटरमधील सर्व मुलींमध्ये तो एकुलता एक मुलगा होता आणि हे पाहून त्याला चक्कर आली. मनीषची मावशी म्हणाली, “तो परीक्षा केंद्रावर गेला आणि त्यानं पाहिलं की वर्ग मुलींनी भरलेला आहे यामुळे तो घाबरला आणि त्याला ताप आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.