Viral Video | शॉर्टकटच्या नादात तरुणाने भलतंच केलं, दुचाकीवर बसून नदी ओलांडण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये एक तरुण नदीकिनारी दुचाकीवर बसल्याचे दिसतेय. दुचाकीवर थाटात बसून तो नदी ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. नदीच्या किनाऱ्यावर वाळू, तसेच चिखल आहे. असे असले तरी शॉर्टकटने नदी ओलांडण्याची घाई तरुणाला झाली आहे. याच घाईपोटी तरुणाने आपली दुचाकी थेट नदीमध्ये घातली आहे.
मुंबई : सोशल मीडियाचं विश्व अगदी वेगळं आहे. या मंचावर रोजच अनेक नव्या गोष्टी घडत असतात. कधी येथे एखादा व्हिडीओ दिवसभर चर्चेचा विषय ठरतो तर कधी एका व्हिडीओमुळे एखाद्या व्यक्तीला जगभरात प्रसिद्धी मिळते. कधी कधी पोट धरून हसायला लावणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या तर अशाच एका तरुणाची फजिती दाखवणारा व्हिडीओ समोर आला असून त्याला पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. या व्हिडीओमध्ये तरुण बाईकवर बसून शॉर्टकटने नदी पार करण्याचा प्रयत्न करत आहे. लवकर जाण्याच्या घाईपोटी त्याची बाईक थेट नादीत बुडाली आहे.
दुचाकीवर थाटात बसून तो नदी ओलांडण्याचा प्रयत्न
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण नदीकिनारी दुचाकीवर बसल्याचे दिसतेय. दुचाकीवर थाटात बसून तो नदी ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. नदीच्या किनाऱ्यावर वाळू, तसेच चिखल आहे. असे असले तरी शॉर्टकटने नदी ओलांडण्याची घाई तरुणाला झाली आहे. याच घाईपोटी तरुणाने आपली दुचाकी थेट नदीमध्ये घातली आहे.
दुचाकी नदीमध्ये बुडाली
मुलाने कशाचाही विचार न करता आपली दुचाकी पाण्यात घातली आहे. तसेच तो दुचाकीवर बसून पाण्यातून नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पाण्याची खोली जास्त असल्यामुळे हा तरुण थेट नदीमध्ये बुडाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शॉर्टकटने नदी ओलांडण्याच्या नादात हा तरुण आपली दुचाकी नदीपात्रात बुडवून बसलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘om_491_rider’ या अकाऊंटवर अपलोड करण्यात आलाय. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. असं वाटतंय की हा तरुण पाताललोकमध्ये जाऊन थांबणार आहे, अशी मजेदार प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एका नेटकऱ्याने माझं हसण थांबत नसल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठऱला असून तो व्हायरल होत आहे.
इतर बातम्या :
Video : लग्नातच नवरदेवाची नवरीकडून धुलाई, काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ
Video : सिगारेट ओढणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाच, सिगारेट सोडून द्याल
Video: आधी मोदी आणि आता अमित शाह, सुजय विखे पुन्हा पुन्हा फ्रेममध्ये का येतात? का हटवले जातात?