गर्लफ्रेंड हवी म्हणून 2000 किलोमीटर चालत गेला, बुद्धांच्या मूर्तीसमोर airpod लावला आणि…
भगवान बुद्धांच्या 71 मीटर उंचीच्या पुतळ्यासमोर पूजा केली आणि मूर्तीच्या कानाजवळ मोठा एअरपॉडसारखा स्पीकर ठेवला आणि त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवला. यामुळे देव त्याचं नीट ऐकून घेऊ शकेल, असं ते म्हणाले.
मुंबई: जे लोक सिंगल आहेत ज्यांना जोडीदार नाही त्यांनाच त्याच्या वेदना समजू शकतात. प्रेयसीच्या इच्छेने एक माणूस 2000 किलोमीटरचा प्रवास करून मंदिरात पोहोचला. त्याने आपल्या मनातील गोष्ट देवासमोर बोलून दाखवली. आता या व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. भगवान बुद्धांच्या मोठ्या पुतळ्यासमोर तो एक मोठा स्पीकर घेऊन प्रार्थना करत आहेत. प्रेयसीसोबतच त्याने करोडपती होण्यासाठी आणि कार मिळावी यासाठी प्रार्थनाही केली.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ झांग नावाच्या व्यक्तीने चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डौयिनवर शेअर केला आहे. चीनच्या झेजियांग प्रांतातून 2000 किलोमीटरचा प्रवास करून ते सिचुआन प्रांतातील लेशान जायंट बुद्ध या बौद्ध मंदिरात आले. इथे भगवान बुद्धांची भव्य मूर्ती आहे. शेकडो वर्षांपूर्वी तांग राजघराण्याने हे बांधले होते.
भगवान बुद्धांच्या 71 मीटर उंचीच्या पुतळ्यासमोर पूजा केली आणि मूर्तीच्या कानाजवळ मोठा एअरपॉडसारखा स्पीकर ठेवला आणि त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवला. यामुळे देव त्याचं नीट ऐकून घेऊ शकेल, असं ते म्हणाले.
तो माणूस बुद्धाला काय म्हणाला?
झांग नावाचा एक माणूस बुद्धमूर्तीसमोर जोरात म्हणाला- ‘विशाल बुद्धा, माझे वय 27 वर्षे आहे आणि माझ्याकडे ना गाडी आहे ना गर्लफ्रेंड. मला आधी श्रीमंत व्हायचे आहे. मला फक्त 10 दशलक्ष युआन (12 कोटी रुपये) हवे आहेत. पैशांऐवजी सुंदर आणि माझ्यावर प्रेम करणारी मैत्रीणही मला हवी आहे.
बुध वक्री असल्याने नशीब साथ देत नाही, असेही त्या व्यक्तीने सांगितले. हा दोष दूर करण्यासाठी ते मंदिरात आले. बुध वक्री असणे ही एक ज्योतिषीय घटना आहे असं म्हणतात. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.