उत्साहात हरपलं भान! किस केल्यानंतर गर्लफ्रेंडला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये भरती
एक मुलगी आयुष्यातील तिचे 'पहिले चुंबन' कायम लक्षात ठेवेल, परंतु चांगल्या कारणास्तव नाही तर एका अपघातामुळे.
असं म्हटलं जातं की पहिलं प्रेम कुणीही विसरू शकत नाही. ते प्रेम निघून गेलं असलं तरी त्याच्या आठवणी हृदयात कायम ताज्या असतात. याशिवाय लोक त्यांचे पहिले ‘किस’ कधीच विसरू शकत नाहीत. तुर्कस्तानमधील एक मुलगी आयुष्यातील तिचे ‘पहिले चुंबन’ कायम लक्षात ठेवेल, परंतु चांगल्या कारणास्तव नाही तर एका अपघातामुळे. खरं तर या ‘किस’मुळे महिलेला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. पहिल्या डेटला तिच्या बॉयफ्रेंडने तिला असं किस केलं की तिची जीभ कापली गेली. तिची ही ‘वेदनादायी’ कहाणी आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सेडा एर्सोई (Ceyda Ersoy) असे या मुलीचे नाव असून ती तुर्कस्तानची मॉडेल आहे. 34 वर्षीय सेडा एर्सोईने रुग्णालयातून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की ती एका मुलासोबत पहिल्या डेटवर गेली होती. यावेळी दोघांनी फ्रेंचला किस करायला सुरुवात केली, पण तेवढ्यात त्या मुलाने उत्साहात आपले भान गमावले आणि सेडा ला इतक्या धोकादायकपणे किस केले की तिची जीभ कापली गेली. तिचे संपूर्ण तोंड रक्ताने भरले होते आणि अखेर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यानंतर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली.
सेडा एर्सोईने सांगितलं की डॉक्टरांना तिची जीभ शिवावी लागली. सध्या तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, सेडा म्हणाली की कदाचित तिच्या बॉयफ्रेंडला फ्रेंच किस कसे करावे हे माहित नव्हते, म्हणून हा अपघात झाला.
जेव्हा सेडाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या. कुणी म्हणतंय की हे खूप विचित्र आहे, तर कुणी म्हणतंय ‘तुम्ही एलियनला किस केलं की ड्रॅगनला’.
सेडा एर्सोई ही एक प्रसिद्ध तुर्की मॉडेल आहे. तिने 2010 मध्ये मिस फोटोमॉडेल कॉम्पिटिशनचा किताबही जिंकला आहे. ती इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर त्याचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.