स्कर्ट घातलेली मुलं बघताच लोकांच्या अशा काही होत्या प्रतिक्रिया! व्हिडीओ नक्की बघा
आणखी एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन मुले मेट्रोमध्ये "डेनिम स्कर्ट" घालून फिरताना दिसत आहेत. भव्या कुमार आणि समीर खान नावाच्या युजर्सने 16 एप्रिल 2023 रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात काही लोक विचित्र कपडे घालून फिरताना दिसत असतात. असे कपडे की ते पाहून सार्वजनिक ठिकाणी येणारे-जाणारे थक्क होतात. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन मुले दिल्ली मेट्रोमध्ये “डेनिम स्कर्ट” घालून फिरताना दिसत आहेत. भव्या कुमार आणि समीर खान नावाच्या युजर्सने 16 एप्रिल 2023 रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ते लांब डेनिम स्कर्ट परिधान करून दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना दिसले.
स्कर्ट घातलेली दोन मुलं दिल्ली मेट्रोत
मुलांच्या या पोशाखाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. दोन मुलं मेट्रो स्टेशनवर चालत असताना हा व्हिडिओ सुरू होतो. त्यापैकी एकाने लांब डेनिम स्कर्ट घातला होता. इतकंच नाही तर त्याने काळा चष्मा आणि निळ्या रंगाचा टी-शर्टही घातलाय. तर त्याच्यासोबत चालणाऱ्या मुलानेही असाच ड्रेस परिधान केला होता. दोघंही खूप हटके दिसत होते. हाच स्कर्ट घालून ही मुलं मेट्रोमध्ये प्रवेश करतात आणि व्हिडिओची उत्सुकता वाढत जाते. आत गेल्यावर तो प्रवाशांमध्ये उभा राहताच सर्वजण या दोघांकडे बघत राहतात. आता गंमत अशी आहे की लोकांच्या प्रतिक्रिया या कॅमेऱ्यात कैद झालेल्या आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मेट्रोत असताना त्यांनी काही प्रवाशांच्या प्रतिक्रियाही दाखवल्यात. या व्हिडिओला 18 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. काहींनी पुरुषांसाठी हे कपडे नॉर्मल आहेत असं म्हटलंय. तर काहींनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत. युजर्सकडून अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने तर याला ‘डेनिम लुंगी’ असं लिहिलंय.