फोटोत किती हत्ती दिसतायत? “4 हत्ती” दिसत असतील तर तुम्ही फसलात!
या चित्रात एकूण 4 हत्ती आहेत असा विचार करत असाल तर हे ऑप्टिकल इल्यूजन चित्र आहे.
इंटरनेटवर आजकाल असंख्य ऑप्टिकल इल्युजन आहेत, त्यातील अनेक गोष्टी सोडवण्यात खूप मजा वाटते. मात्र, काही फोटो पाहून लोकांची डोकी फिरतात. ऑप्टिकल भ्रमांमध्ये लपलेला प्राणी शोधणे, कोडे, टीझर आणि बरेच काही यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. या भ्रमांचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या बुद्धी आणि निरीक्षण कौशल्य याची पातळी वाढविणे. प्रत्येकाला हे ऑप्टिकल भ्रम समजत नाहीत. या सरावाने लोक त्यांचे निरीक्षण कौशल्य सुधारू शकतात. या ऑप्टिकल भ्रमात नदीच्या काठावर उभ्या असलेल्या हत्तींची संख्या मोजता येईल का? यामध्ये हत्तींचा कळप एका नदीच्या काठावर पाणी पिताना दिसत आहे.
बहुतेक लोक हे पाहून चकित झाले आहेत, ज्यात तीन महाकाय हत्ती नदीच्या काठावर पाणी पिताना दिसतात, तर जवळच हत्तीचे एक पिल्लू देखील उपस्थित आहे.
उत्तर शोधायचं असेल तर चित्राकडे नीट पाहा. या चित्रात एकूण 4 हत्ती आहेत असा विचार करत असाल तर हे ऑप्टिकल इल्यूजन चित्र आहे. या चित्रात किती हत्ती उपस्थित आहेत, हे आपल्याला डोकं लावून विचार करावा लागेल कारण शेवटी हे कोडं आहे.
अनेकांनी हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक लोक अपयशी ठरले. यावर उपाय सांगण्याआधी आम्ही तुम्हाला एक हिंट देतो – जरा नीट बघा तुम्हाला पाचवा हत्ती सुद्धा दिसत असेल. त्या हत्तींच्या मध्ये कुठे एखादा हत्ती दिसतोय का?
जर तुम्ही चित्राकडे नीट पाहिलंत, तर तुम्हाला त्यावर उपाय सापडेल. चित्राच्या खालच्या भागाकडे पाहिल्यास दोन मोठ्या हत्तींच्या पायांच्या मध्ये हत्तीच्या पिलाचे डोके दिसते.
Few days back we have posted this image as 7in1 Frame, now watch carefully till the end how this is 7in1 frame. #Elephant Love. #wildlense.@susantananda3 @ParveenKaswan @SudhaRamenIFS @Saket_Badola https://t.co/rvdXnGohrT pic.twitter.com/sN7Y9ag4me
— WildLense® Eco Foundation ?? (@WildLense_India) July 30, 2020
या गोंधळात टाकणाऱ्या ऑप्टिकल भ्रमाचे बरोबर उत्तर सात आहे. आता तुम्ही विचार करत असाल की सात कसे असू शकतात, तर चला उत्तरासाठी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामुळे तुम्हाला एकूण किती हत्ती उपस्थित होते हे समजेल.
या व्हिडिओमध्ये पहिले चार हत्ती पाणी पिताना दिसत आहेत, मात्र त्यानंतर तुम्हाला पाचवा हत्ती दिसेल आणि मग हळूहळू एकूण सात हत्ती दिसतील.