नऊ बायकांसाठी ‘त्या’ तरूणाचा नवा नियम, ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.या तरूणाचं नाव आर्थर ओ उर्सो असं आहे. या आर्थरने त्याच्या बायकांसाठी आता एक नवा नियम आणला आहे
मुंबई : ब्राझीलमध्ये (Brazil) राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच्या या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. या तरूणाचं नाव आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) असं आहे. त्याचा त्याच्या बायकांसोबतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या आर्थरने त्याच्या बायकांसाठी आता एक नवा नियम आणला आहे.
प्रथन येणाऱ्यास प्राधान्य
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.या तरूणाचं नाव आर्थर ओ उर्सो असं आहे. या आर्थरने त्याच्या बायकांसाठी आता एक नवा नियम आणला आहे. तो नियम म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. आर्थरने स्वत: याविषयी माहिती दिली आहे. आर्थरला त्याचं पहिलं अपत्य कोणत्या पत्नीपासून होईल हे ठरवलेलं नाही, असं सांगितलं शिवाय “मला कोणत्याही बायकोपासून मूल झालं तरी काही फरक पडणार नाही. सर्व लोक मिळून मुलाची प्रेमाने काळजी घेऊ. माझी कोणतीही एक आवडती पत्नी नाही. जिच्याकडून मला मुलं होतील. मला हे मूल नैसर्गिक प्रक्रियेतूनच होऊ द्यायचं आहे. मला विश्वास आहे की जेव्हा घरात पहिलं मूल जन्माला येईल तेव्हा सर्वांना त्या परिस्थितीची जाणीव असेल. ज्यानंतर प्रत्येकाला ते अनुभवायला आणि अनुभवायला आवडेल. सगळे त्याचा लाड करतील. मात्र ते ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ असेल, असं त्याने सांगितलं आहे.
View this post on Instagram
आर्थरच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. इन्स्टाग्रामवर आर्थरला 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. तो इन्स्टावर पत्नीसोबत फोटो टाकत असतो. कधी तो तिच्यासोबत रोमान्स करताना दिसतो, तर कधी त्यांच्यासोबत आउटिंग करताना दिसतो.
View this post on Instagram
चांगला वेळ घालवता यावा म्हणून टाईमटेबल
आता नऊ बायका म्हटल्यावर कुणाला किती वेळ द्यायाचा हा त्याच्यासमोर होता. त्यावरही त्याने उत्तर शोधून काढलंय. त्याने यासाठी एक विशेष टाईमटेबल प्लॅन केलंय. त्यानुसार तो प्रत्येकीला वेळ देत होता. पण मग हे टाईमटेबल फॉलो करायला त्याला अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने या टाईमटेबलला केराची टोपली दाखवली. त्याचं कारण त्याने स्वत:च सांगितलं आहे. “कधीकधी मला असं वाटायचं की मी दबावाखाली माझ्या बायकांसोबत प्रेम करतो किंवा रोमान्स करतो.तर काही वेळा सगळ्यांना वेळ देऊनही कुणाची ना कुणाची तक्रार असाचीच की मला वेळ देत नाही म्हणून मग मी हे टाईमटेबल मोडीत काढलं.”
View this post on Instagram