Viral | ढसाढसा रडत व्हायोलीन वाजवत असलेल्या मुलाची काळीज पिळवटून टाकणारी हृदयस्पर्शी गोष्ट
या फोटोत जगातील मानवतेचा शक्तिशाली आवाज ऐकायला मिळू शकेल! सनदी अधिकारी असलेल्या अवनीश शरण यांनी हा फोटो आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन शेअर केला असून मार्कोस ट्रिस्टाव यांनी हा फोटो काढलाय.
लहान मुलं निरगस असतात. त्यांची प्रत्येक कृती निरागस असते. ते कोणतीही गोष्ट ठरवून करत नाहीत. मनापासून करतात. त्यांचं हसणं, रडणं, आनंदी होणं, दुःखी होणं, या सगळ्यात निरागसता ठासून भरलेली असते. भरपूर स्ट्रेसमध्ये असलेल्या एका माणसाला लहान मुलाचं निरागस हसू, स्ट्रेस फ्री करण्यासाठी मदत करतं. पण निरागस मुलांच्या डोळ्यात पाणी दिसलं, की टचकन काळजाला हात घातल्यासारखा अनेकांचा जीव तुटतो. लहान मुलं मुळात असतातच खास! सध्या सोशल मीडियावर एका रडणाऱ्या मुलाचा फोटो खूप चर्चिला जातोय. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर दुःख आणि ढसाढसा रडू आलेलं असतानाही व्हायोलीन वाजवत असलेल्या या मुलाच्या रडण्यामागचं कारण काळजाचे तुकडे पाडणारं आहे. अत्यंत हृदयस्पर्शी असलेल्या या फोटोनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलंय.
कोण आहे हा मुलगा?
रडणाऱ्या या मुलाचं नाव आहे डिएगो फ्रैजो तुर्काटो. ब्राझीलमध्ये असलेला हा मुलगा आतून पूर्णपणे तुटल्याचं, त्याच्या चेहऱ्यावरुन लक्षात येतं. ब्राझीलमधील या मुलाच्या फोटोसोबत इतरही दोन-तीन मुलं व्हायोलीन वाजताना फ्रेममध्ये दिसली आहेत. त्या सगळ्यांच्या रडण्याचं कारण आहे, एका शिक्षिकेचा मृत्यू!
शाळा, कॉलेज सोडताना आपल्या प्रिय शिक्षकांशी ताटातूट होताना अनेक विद्यार्थी रडतात. पण इथंली गोष्ट तर त्याहीपेक्षा वेदनादायी आहे. ज्या शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे, त्या शिक्षिकेनं या मुलांना गुन्हेगारी आणि गरिबीच्या चक्रव्यूहातून बाहेर काढलं होतं. त्यांना चांगलं आयुष्य दिलं होतं. त्यांच्यावर संस्कार केले होते.
गरिबीनं पछाडलेली, निराधार असलेली, वाऱ्यावर आयुष्य असलेल्या यामुलांना निधन झालेल्या शिक्षकानं आधार दिला होता. आपल्या उज्जव भविष्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या या शिक्षिकाच्या मृत्यूनं ही मुलं पूर्णपणे बिथरली. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या शिक्षकाच्या अंत्यसंस्कारावेळी अंतिम अलविदा करताना मुलांनी व्हायोलीन वाजवून श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर जे दुःख दिसलं, ते कोणत्याच शब्दांत व्यक्त केलं जाऊ शकत नाही.
एक फोटो = हजार शब्द
एक फोटो हजार शब्दांपेक्षा जास्त बोलतो असं म्हणतात, ते यामुळेच! शिक्षकानं आपल्यावर केलेल्या प्रेमामुळे आज आपण चांगलं आयुष्य जगू शकत आहोत, ही जाणीव या मुलांच्या डोळ्यात दिसतेय. आज त्या शिक्षकाचं निधन झाल्यानं आपलं आता पुढं काय होणार, या प्रश्नानं ही मुलं गलबलून गेलीत. आपल्या शिक्षकाप्रती या मुलांच्या मनात ओतप्रोम आदर, प्रेम आणि माया होती. ही माया त्या शिक्षकानं कमावली होती. ती या अंत्यसंस्कारावेळी या मुलांच्या डोळ्यातून, त्यांनी छेडलेल्या व्हायोलीनच्या वेदनादायी सुरांमधून झळकत होती.
कुणी काढलाय फोटो?
गरिबीमुळे लहान मुलं गुन्हेगारीकडे वळण्याची सर्वाधिक भीती असते. त्यामुळे वेळीच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. हे थोर काम शिक्षकच करु शकतात. या फोटोत जगातील मानवतेचा शक्तिशाली आवाज ऐकायला मिळू शकेल! सनदी अधिकारी असलेल्या अवनीश शरण यांनी हा फोटो आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन शेअर केला असून मार्कोस ट्रिस्टाव यांनी हा फोटो काढलाय.
This photo was taken of a Brazilian boy (Diego Frazzo Turkato),playing the violin at the funeral of his teacher who rescued him from the environment of poverty and crime in which he lived.
In this image,humanity speaks with the strongest voice in the world.
Pic: Marcos Tristao pic.twitter.com/MkWUd5DcBE
— Awanish Sharan (@AwanishSharan) December 19, 2021
पाहा व्हिडीओ –
इतर बातम्या –