तेरा प्यार प्यार प्यार…? पुढच्या ओळी व्हिडीओ बघून आपोआप पूर्ण होतील
लग्नात गेलेले पाहुणेच नाही तर व्हिडिओ पाहणारे लोकही हैराण झाले आहेत.
तुम्ही वधू-वरांना हार घालून किंवा स्टेजवर नाचताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी वधू-वरांना स्टेजवर हुक्का पिताना पाहिलं आहे का? होय, असंच काहीसं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झालाय. या सीझनमध्ये तुम्हाला त्याच्याशी संबंधित सर्वप्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. नववधूच्या मेकअपपासून ते लग्नाच्या मंडपापर्यंत आणि नववधूच्या निरोपापर्यंतचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ खूप मजेशीर असतात, अनेक व्हिडिओ लोकांना भावनिकही बनवतात. मात्र, काही वेळा काही व्हिडिओ एकदम चकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतआहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
परदेशात लग्नसमारंभात वधू-वरांनी एकमेकांना किस करणं सामान्य गोष्ट आहे, पण भारतात अशी कोणतीही परंपरा नाही, पण या व्हायरल व्हिडीओमध्ये मात्र असंच काहीसं पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ पाहून लग्नात गेलेले पाहुणेच नाही तर व्हिडिओ पाहणारे लोकही हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, स्टेजवर वधू-वर उभे आहेत आणि त्यांच्यासमोर एक हुक्काही ठेवण्यात आला आहे, ज्याचा पाइप नवरीच्या हातात आहे.
हुक्का पिताना नवरी तोंडात खूप धूर घेते आणि मग तो धूर नवरदेवाच्या तोंडात किस करताना सोडते. साहजिकच लग्नसमारंभात आलेल्या पाहुण्यांना हे पाहून धक्का बसला असणार.
View this post on Instagram
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर laiba._waseem नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 64 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक देखील केला आहे.