वरमाला गळ्यात पडताच नवरीने नवरदेवाला कानशिलात लगावल्या; त्यानंतर तडक…
सध्या लग्नाचा सीजन आहे. त्यामुळे कुठे ना कुठे रोज लग्न होत आहेत. बँडबाजाचा आवाज ऐकू आला की कुठे तरी लग्न होतंय असं समजून जायचं. लग्न आणि लग्नातील किस्से ही काही नवीन गोष्ट नाही. पण सध्या एक लग्न प्रचंड चर्चेत आहे. हे लग्न कुठलं आहे माहीत नाही. पण या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. लोक त्यावर कमेंटचा पाऊस पाडत आहेत. काय आहे त्यात असं?
नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : लग्न हे दोन जीवांचं मिलन असतं. लग्नानंतर आयुष्याची नवी इनिंग सुरू होते. नवी स्वप्न उराशी घेऊन हे जोडपं आपलं आयुष्य पुढे नेण्याचं काम करत असतात. कुटुंबीयांकडूनही लग्नात कोणतीही कसूर केली जात नाही. अत्यंत धुमधडाक्यात लग्न लावू दिलं जातं. मुलीलाही चांगला नवरा मिळावा ही अपेक्षा असते. पण लग्नाच्या दिवशीच जर तिचा होणारा नवरा एक नंबरचा बेवडा आहे हे जर तिला कळलं तर? असाच एक किस्सा एका लग्नात घडला. त्यानंतर जे घडलं ते पाहून वऱ्हाडीही थक्क झाले.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील दृश्य पाहून सर्वच अवाक् होत आहे. नवरदेवाने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीने त्याच्या कानशिलात सटासट लगावल्या. त्यानंतर संतापलेली नवरी तिथून निघून गेली. नवरीचा हा जमदग्नीचा अवतार पाहून सर्वच थक्क झालं. वऱ्हाडींना तर काय बोलावे तेच कळत नव्हते. सर्वच शांत झाले. लग्न मंडपात काही काळ स्मशान शांतता पसरली होती.
व्हिडीओत काय?
एका लग्नाचा हा व्हिडीओ आहे. सर्व वऱ्हाडी मंडळी जमलीत. धार्मिक विधी पार पडला. मंत्रोच्चार झाले. भटजीने सांगताच नवरदेवाने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकली. गळ्यात वरमाला पडताच संतापलेल्या नवरीचा राग अनावर झाला. तिने नवरदेवाच्या गळ्यात टाकायची वरमाला फेकून दिली आणि तिथेच नवरदेवाच्या दोनचार कानाखाली सटासट लगावल्या आणि तडक निघून गेली. नवरी अत्यंत संतापलेली होती. तिचा अवतार पाहून सर्वच अवाक् झाले. काय झालं? कसं झालं?
असं काय झालं?
नवरीच्या संतापाचं कारणही तसंच होतं. नवरदेव दारू ढोसून आला होता. त्याने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताच नवरीला दारुचा प्रचंड वास आला. त्यामुळे नवरी संतापली. तिचा पारा चढला. नवरदेवाला लग्नात शुद्धच राहिली नाही. त्यामुळे संतापलेल्या नवरीने थेट नवरदेवाच्या कानशिलात लगावली.
नवरीला समर्थन
हा व्हिडीओ @gharkekalesh या नावाने एक्स अकाऊंटवर आहे. हा व्हिडीओ पाहून लोक तो प्रचंड व्हायरल करत आहेत. त्यावर कमेंटचा पाऊसही पडत आहे. नवरदेव नशेत तर्रर होता तर गळ्यात वरमाला पडेपर्यंत नवरीने वाट का पाहिली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. आपला होणारा नवरा दारुडा आहे हे नवरीला वेळीच कळलं हे बरं झालं, असं एकाने म्हटलंय. एकाने तर लग्न झालं की नाही? असा सवाल केला आहे. आणखी एकाने मजेदार कमेंट केली आहे. नवरीचा हा अवतार पाहून नवरदेवाची तर उतरली असेल, असं या व्यक्तीने म्हटलं आहे.
Kalesh b/w Bride and Groom on Stage over bride smells alcohol from his mouth pic.twitter.com/tRVfcrYy2B
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 22, 2023