सनईचे चौघडे वाजले, नवरदेव वरमाला घालणार तेवढ्यात दोनच्या पाढ्याने घात केला, थेट लग्नच मोडलं, नेमकं काय घडलं?

मुलाची वरात ही 30 एप्रिलला रात्री नवरीच्या घरी गेली. तिथे वरातीची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या जल्लोषात लग्न पार पडत होतं (Bride broke marriage after groom not able to given answer to his question).

सनईचे चौघडे वाजले, नवरदेव वरमाला घालणार तेवढ्यात दोनच्या पाढ्याने घात केला, थेट लग्नच मोडलं, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 5:12 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मोहोबच्या खरेला येथे एका शुल्लक कारणावरुन नवरीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालताना लग्न मोडलं. तिने वरमाला घालण्याआधी नवरदेवाला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकूण नवरदेव सैरभैर झाला. त्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून नवरीने थेट लग्नाला नकार दिला (Bride broke marriage after groom not able to given answer to his question).

मोठ्या उत्साहात वरात नवरीच्या घरी आली

संबंधित लग्न हे 30 एप्रिलला होतं. मुलाची वरात ही 30 एप्रिलला रात्री नवरीच्या घरी गेली. तिथे वरातीची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या जल्लोषात लग्न पार पडत होतं. नवरदेव यावेळी उत्साहात विचित्रपणे वर्तवणूक करत होता. हे नवरी बघत होती. नवरीचे ऐन वरमाला गळ्यात घालणाच्यावेळी अचानक विचार बदलले. तिने नवरदेवाला एक प्रश्न विचारला. नवरदेवाने या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच लग्न करेन, अन्यथा लग्न करणार नाही, असं मुलीने स्पष्ट केलं.

दोनचा पाढा बोलायला सांगितलं आणि…

नवरीने नवरदेवाला दोनचा पाढा बोलायला लावला. नवरीच्या प्रश्नानंतर नवरदेवाला काय बोलावं तेच सुचेना. तो सैरभैर झाला. तो इकडेतिकडे बघू लागला. आपली पोलखोल झाली, अशा विचाराने त्याने मान खाली घातली. त्यानंतर मुलीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. नवरीचा हा निर्णय ऐकूण मंडपात जल्लोष करणाऱ्यांच्या पायाखालची जमीन घसरली. आनंदाच्या वातावरणाचं रुपांतर अचानक तणावात बदललं. नेमकं काय बोलावं ते कुणालाही समजत नव्हतं. मात्र, ज्या मुलाला गणितातल्या साध्या गोष्टी माहिती नाही, त्याच्यासोबत लग्न करणार नाही, असं नवरी म्हणत होती.

पोलिसांच्या मध्यस्तीने प्रकरण निवळलं

मुलीच्या आणि मुलाच्या नातेवाईकांनी तिला भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला. या समजवण्यातच संपूर्ण रात्र गेली. मात्र, नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे अखेर नवरीच्या निर्णयानुसार लग्न मोडण्यात आलं. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. मुलीच्या बाजूच्या नातेवाईकांनी मुलाच्या कुटुंबियांना लग्नाचा खर्च द्यावा, अशी मागणी केली. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकूण घेतली. त्यानंतर दोघांच्या संमतीने दागिन्यांचं वाटप केलं जावं, असा निर्णय घेण्यात आला.

नवरीने असं का केलं?

नवरीचं लग्न ठरलं त्यावेळी मुलाकडच्यांनी तो शिकलेला आहे, असं सांगण्यात आलं. मात्र, जेव्हा लग्न पार पडत होतं, तेव्हा तिला माहिती पडलं की, मुलगा शिकलेला नाही. त्यामुळे मुलीने वरमाल घालण्याच्या वेळी प्रश्न विचारुन लग्न मोडलं (Bride broke marriage after groom not able to given answer to his question).

हेही वाचा : अनेक महिन्यांपासून नाही कापलेस केस, तरीही तू आहेस ‘ब्युटीफुल इन एनी केस’, मातृदिनाचे औचित्य साधत पोलिसांचे भन्नाट ट्वीट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.