वरमालाच्या वेळी वधूचा लग्नास नकार, कारण ऐकून सगळ्यांनी समजवायचा प्रयत्न केला पण…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 29 मे रोजी पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर इथल्या एका तरुणासोबत वधूचे लग्न ठरले होते. ठरलेल्या दिवशी नवरदेव भव्य विवाह मिरवणूक घेऊन मुलीच्या घरी पोहोचला आणि लग्नाच्या स्टेजवर वरमालासाठी वधू येईपर्यंत सर्व काही ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरू होते.
लखनऊ: उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. इथे एका वधूने नवरदेवाचा रंग अतिशय काळा असल्याचे सांगून लग्नास नकार दिला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 29 मे रोजी पिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर इथल्या एका तरुणासोबत वधूचे लग्न ठरले होते. ठरलेल्या दिवशी नवरदेव भव्य विवाह मिरवणूक घेऊन मुलीच्या घरी पोहोचला आणि लग्नाच्या स्टेजवर वरमालासाठी वधू येईपर्यंत सर्व काही ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरू होते. वरमालासाठी स्टेजवर पोहोचल्यानंतर वधूने नवरदेवाला पाहताच त्याला हार घालण्यास नकार दिला.
वधूच्या नकाराने तिच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. वधूला तिच्या निर्णयाबद्दल विचारले असता तिने उत्तर दिले की तिला काळ्या त्वचेच्या पुरुषाशी लग्न करायचे नाही. तिने असेही सांगितले की नवरदेव खूप म्हातारा होता. वधूने लग्नाला नकार दिल्याने वाद सुरू झाला, पण तिने आपला निर्णय बदलला नाही. तिच्या घरच्यांनी तिला आपला निर्णय बदलण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती मागे हटली नाही.
नंतर पंचायत बोलावण्यात आली आणि मग वधूची समजूत काढण्याचे खूप प्रयत्न झाले, पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी वधूच्या आग्रहाखातर सर्वांनी पराभव मान्य केला आणि नवरदेवाला आपले लग्न मागे घ्यावे लागले. ही घटना पहिल्यांदाच घडली नाही. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. मात्र यूपीच्या या प्रकरणाने लोकांना विचार करायला भाग पाडले, कारण केवळ काळ्या रंगामुळे नवरदेवाला लग्नाची मिरवणूक घेऊन परतावं लागलंय.