लग्नात नवरीच्या पराक्रमाने लोकं म्हणताहेत, असली नवरी रशिया-युक्रेनच्या युद्धात पाहिजे..!

पोलीस प्रशासनाकडून या अशा घटनांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतात पण तरीही लोकं आपल्या हौसेखातर बार उडवण्यात दंग असतात. असे प्रकार अतिउत्साहातच घडले जातात आणि मग कधी कधी कारण नसताना कुणाचा तरी बळी जातो आणि सगळा अतिउत्साह मग अंगलट आलेला असतो.

लग्नात नवरीच्या पराक्रमाने लोकं म्हणताहेत, असली नवरी रशिया-युक्रेनच्या युद्धात पाहिजे..!
FiringImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 8:39 AM

मुंबईः लगीनघाई असली की, लोकंही धाक ना दरारा असल्यासारखं वागू लागतात. विवाह मग कुणाचाही असो स्टंटबाजी (Stunt) करण्यात लोकं अगदी माहीर असतात. लग्न (Marriage) मग गावात असो की, शहरात अतिउत्साहात येऊन आता अनेक पिस्तुल (Pistol) किंवा बंदुकातून उघड्यावर फायरिंग करण्याचा प्रकार आताच घडत नाही तर याआधी अनेकदा घडले आहेत. पोलीस प्रशासनाकडून या अशा घटनांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतात पण तरीही लोकं आपल्या हौसेखातर बार उडवण्यात दंग असतात. असे प्रकार अतिउत्साहातच घडले जातात आणि मग कधी कधी कारण नसताना कुणाचा तरी बळी जातो आणि सगळा अतिउत्साह मग अंगलट आलेला असतो.

सध्या सोशल मीडियावर हे एका लग्नातील वधूचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. एक वधू आपल्या लग्नाच्या सभामंडपात हातात पिस्तुल घेऊन हवेत तिने तीन वेळा गोळीबार केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वधू फायरिंग करताना दिसत असली तरी हा व्हिडीओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला याबद्दलची माहिती दिलेली नाही. तरीही हा व्हिडिओ अनेक जणांकडून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepesh Thakur (@deepesh966)

अशा घटनेत अनेकदा अपघात

या व्हिडिओत फायरिंग करणारी तरुणी ही काही पहिलीच नाही किंवा अशी घटना पहिल्यांदाच घडते असेही काही नाही. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत आणि त्या घडू नयेत म्हणून पोलिसांकडून अनेकदा कारवाईही करण्यात आली आहे. तर काही जणांवर अगदी कडक कारवाई करण्यात आली आहे. जाहीर कार्यक्रमातून अशा काही घटना घडल्या जातात तेव्हा मात्र अनेक वेळा अपघातही घडले आहेत. ज्यामध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

विवाहमंडपातच गोळीबार

नववधू आपल्या पेहराव्यात एका विवाहमंडपात थांबून, हातात पिस्तुल घेऊन हात वर करुन ती हवेत तीन वेळा गोळीबार करत आहे. त्या व्हिडिओमध्ये नवधूला कुणीतरी सांगत आहे आणि त्यांच्या सांगण्यावरुन तिने हवेत तीन वेळा गोळीबार केला आहे. अतिउत्साहात येऊन केलेली ही कृती घातक असली तरी अनेक लोक नववधूचे कौतूक करत आहेत.

10 लाखांहून अधिक व्ह्यूज

हा व्हिडिओ deepesh966 या इंस्टाग्राम हँडलने शेअर करण्यात आला आहे. त्याच्या या नववधूच्या पोस्टला 67 हजारांहून अधिक लाईक्स आणि 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. या कमेंटमध्ये एकाने लिहिले आहे की, आतापर्यंत एकही एफआयआर नाही. त्याचवेळी, काहींनी लिहिलं की आता नवराच जगेल. इतरांनी वधूला सिंहिणी असेही संबोधले.

संबंधित बातम्या

Video | ‘हात जोडून विनंती करते, वाचवा त्या मुलीला..वाचवा!’ चित्रा वाघ यांची हात जोडून नेमकी कुणासाठी विनंती?

Uddhav Thackarey : विकास हा मुळावर येणारा नव्हे तर शाश्वत असावा : उद्धव ठाकरे

Video | ओये गुरुsss.. जुना व्हिडीओ पुन्हा Viral भिडू! भगवंत मान यांच्या जोकवर जेव्हा सिद्धू खळखळून हसले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.