Video | भर मंडपात नवरी रुसली, नवरदेवाची चांगलीच फजिती, पाहा व्हिडीओ
सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये नवऱ्या मुलाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. (bride shocking reaction video)
मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये नवरी रुसल्यामुळे नवऱ्या मुलाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. (Bride gave shocking reaction while marriage ceremony video goes viral on social media)
व्हिडीओमध्ये काय आहे ?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरा मुलगा लग्नमंडपात उभे असल्याचे दिसते आहे. मात्र, नवरी ही नवऱ्या मुलावर चांगलीच रुसली आहे असे वाटतेय. दोघेही एकमेकांच्या हातात वरमाला घेऊन उभे आहेत. एकमेकांच्या गळ्यात टाकण्यासाठी त्यांनी हातात वरमाला घेतलेली आहे. मात्र, जेव्हा त्यांना वरमाला टाकण्याचे सांगण्यात येते, तेव्हा चांगलीच धांदल उडाली आहे.
नवरी रुसली, नंतर नवरदेवाची पंचाईत
नवरी ही नवरा मुलगा आपल्या गळ्यात वरमाला टाकतोय की नाही याची वाट पाहत नाहीये. नवरा मुलगा वरमाला टाकत असतानाच नवरीसुद्धा रागात येऊन गडबडीमध्ये नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकत आहे. हा सगळा प्रकार दोन ते तीन सेकांदामध्ये घडतोय. गडबड केल्यामुळे वरमाला ही नवरी आणि नवरदेवाच्या डोक्यावर अडकली आहे. परिणामी सगळा गोंधळ उडाला आहे.
शेवटी बाजूला उभा असलेला फोटोग्राफर तसेच नवरेदवाच्या मित्रांना जवळ यावं लागल्याचं दिसतंय. बाजूच्या लोकांनी नवरी तसेच नवरदेवाच्या गळ्यात अडकलेल्या वरमाला आढल्या आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला
नेटकऱ्यांना लग्न समारंभातील व्हिडीओ जास्त आवडतात. लग्नाच्या वेळी घडलेले किस्से तसचे नवरी नवरदेवाच्या फजितीचे व्हिडीओ सोशल मीडियावर लवकर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लोक चांगलेच पसंद करत असून मजेदार कमेंट्सही करत आहेत.
इतर बातम्या :
असला नवरा नको गं बाई; नवरदेवाला पाहून नवरीचा पारा चढला; व्हिडीओ पाहिल्यावर पोट धरून हसाल
Viral Video : दारुड्या नवरदेवाची करामत, नवरी समोर असताना केलं भलतंच काम, सोशल मीडियावर धुमाकूळ
Video | डोक्यावर ओढणी घेऊन पोळ्या लाटणारी तरुणी, सौंदर्याचे नेटकरी दिवाने, व्हिडीओ एकदा पाहाच
(Bride gave shocking reaction while marriage ceremony video goes viral on social media)