“तु काळा आहेस माझ्या मैत्रिणी मला चिडवतील” नवरी म्हणाली नवरदेवाला! पुढे…

| Updated on: Dec 08, 2022 | 10:42 AM

इतकंच काय तर मुलगा काळा असल्यामुळे आपल्या कुटुंबाची सुद्धा बदनामी होईल असं तिला वाटतं.

तु काळा आहेस माझ्या मैत्रिणी मला चिडवतील नवरी म्हणाली नवरदेवाला! पुढे...
woman refuse to marry
Image Credit source: Social Media
Follow us on

बरेली: आजकाल लग्न कुठल्या गोष्टीवरून तुटेल हे सांगणं फार कठीण आहे. लोकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या आणि विचित्र असतात. त्या अपेक्षांमुळे खरं तर नाती तुटतात. माणसाला चांगल्या वाईटासह स्वीकारणं आजकाल कुणालाही जमत नाही कदाचित अनेक पर्याय उपलब्ध असल्यानेही होत असेल. असाच एक किस्सा घडलाय बरेलीमध्ये. एका मुलीने नवरदेव काळा आहे म्हणून लग्नाला नकार दिलाय. इतकंच काय तर मुलगा काळा असल्यामुळे आपल्या कुटुंबाची सुद्धा बदनामी होईल असं तिला वाटतं.

बरेलीतील एका गावात बेबी शॉवर सेरेमनीनंतर एका नववधूने लग्नास नकार दिला. तुझा रंग काळा आहे आणि तू कमी शिकलेला आहेस असं म्हणत या नववधूने लग्नास नकार दिला. लग्नानंतर तिच्या मैत्रिणी तिची चेष्टा करतील असं ती म्हणाली. जर नवरदेवाने लग्नास नकार दिला नाही तर ती घरातून पळून जाईल असंही ती म्हणाली.

हे ऐकून नवरदेवाला धक्काच बसला आणि त्याने लगेच लग्नास नकार दिला. नवरदेवाच्या नकारामुळे वधूपक्षातील लोक भडकले आणि वाद सुरू झाला.

नवरीच्या घरच्यांनी वराच्या बाजूचे सर्व सामान हिसकावून घेतले आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. दिल्लीतील निहाल विहारमध्ये राहणाऱ्या दुर्गा प्रसाद यांनी हुंडा न घेण्याच्या अटीवर कॅन्टोन्मेंटमधील रहिवाशी असणाऱ्या एका मुलीशी लग्न ठरवले होते.

सहा महिन्यांपूर्वी ते कुटुंबीयांसह मुलीच्या घरी तिलक आणि गोद भराईच्या विधीसाठी आले होते. या दरम्यान तरुणीने आपल्या भावी पतीला तु कृष्णवर्णीय असून अल्पशिक्षित असल्याचे सांगितले.

दुर्गा प्रसाद सांगतात की, नवरीचं बोलणं ऐकून त्यांनी लग्नाला नकार दिला. यानंतर महिलेच्या मेव्हण्यानं दुर्गा प्रसाद यांच्या कुटुंबीयांना मोबाईलवरून शिवीगाळ करत खोट्या प्रकरणात तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली.

कुटुंबीयांशी झालेला वाद मिटवण्यासाठी तो मुलीच्या घरी आला, पण काही निष्पन्न झालं नाही. याशिवाय नवरीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाला दोन लाख रुपयांची मागणी केली.

त्यांनी पैसे न दिल्याने त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले, तसेच त्यांचे सर्व सामानही हिसकावले.

शेवटी या प्रकरणात नवरदेवाच्या बाजूला कोर्टात आश्रय घ्यावा लागला. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे.