नवा ट्रेंड! घरून काम करणाऱ्यांसाठी Pub ची खास ऑफर, वर्क फ्रॉम पब!

होय, या नव्या ट्रेंडमध्ये एका पब कंपनीने "वर्क फ्रॉम पब" ची ऑफर दिलीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे.

नवा ट्रेंड! घरून काम करणाऱ्यांसाठी Pub ची खास ऑफर, वर्क फ्रॉम पब!
Work from pubImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 10:03 AM

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर लोकांच्या कामाची पद्धत बदलली आहे. जगभरातील लाखो काम करणारे लोक महामारीच्या काळात ऑफिसला जाण्याऐवजी आपल्या घरातूनच काम करू लागले आणि त्यातूनच वर्क फ्रॉम होम चा जमाना सुरू झाला. कंपनी तर आजकाल घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देतात. कर्मचाऱ्यात काम करण्याची क्षमता अधिकच वाढलीये असं काही कंपन्यांचं म्हणणं आहे. कर्मचारी पण हुशार आहेत त्यांनी वर्क फ्रॉम होम करताना कधी उद्यानातून काम केलं, कधी हॉटेल मधून, कधी मस्त फिरता फिरता काम केलं. वर्किंग शिफ्ट करता करता लोक आता हे सगळंच मॅनेज करू लागलेत. कॅफे सुद्धा लोकांनी सोडला नाही. कॅफे मध्ये सुद्धा ते काम करतात. आता एक नवा ट्रेंड सुरू झालाय.

होय, या नव्या ट्रेंडमध्ये एका ब्रिटिश पब कंपनीने “वर्क फ्रॉम पब” ची ऑफर दिलीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे.

‘वर्क फ्रॉम पब’ ही नवी सेवा सुरू करण्यात आली आहे. द गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार, आता पब ची वाढती संख्या आपला महसूल वाढवण्यासाठी डब्ल्यूएफपी डील ऑफर करत आहे.

फुलर चेन (Fuller’s Chain) 380 पब WFP ऑफर करत आहे. यासाठी दररोज 11 डॉलर खर्च येईल, ज्यात दुपारचे जेवण आणि एक पेय देखील देण्यात येणारे.

ब्रेव्हरी यंग्स चेन च्या 185 पब ने एका दिवसात 17 डॉलर्सचा करार केलाय. जो इतर पबपेक्षा अगदी वेगळा आहे, कारण त्यात सँडविच, दुपारचे जेवण आणि अमर्यादित चहा-कॉफीचा समावेश आहे.

WFPच्या एका ग्राहकाने द गार्डियनला सांगितले की, 10 पौंडमध्ये तुम्हाला बेकन सँडविच, दिवसभर स्विचबोर्ड, टेबल आणि मोफत अमर्यादित चहा-कॉफी मिळते.

पबमध्ये लक्ष केंद्रित करणे आव्हानात्मक असल्याचं म्हटल्यास, पब म्हणतं, “अजिबात नाही”. बागकाम, फ्रीज आणि मांजरींसारख्या कोणत्याही गोष्टी नसल्याने पब मध्ये लक्ष केंद्रित करणे सोपे असल्याचे ते म्हणतात.

बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...