स्वतःचा जीव धोक्यात घालून बहिणीचा जीव वाचवला… राखी का बंधन!
आपल्या बहिणीला धोका असल्याचे त्याने पाहिले आणि लगेचच कसलाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी त्याने आपला जीव पणाला लावला.
मगर हा इतका धोकादायक प्राणी आहे की सर्वांनाच त्याची जाणीव आहे. नुकतंच अशीच एक घटना समोर आली जेव्हा त्याने एका लहान मुलीचा पाय जबड्यात धरला, त्यानंतर तिला वाचवण्यासाठी तिच्या भावाने अक्षरशः जीवाची बाजी लावली. चांगली गोष्ट म्हणजे तोही वाचला. ही घटना नामिबियातील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नऊ वर्षांची रेजिमिया कावांगो येथील हिकेरा गार्डनमध्ये रोपांना पाणी देत होती. दरम्यान अचानक एक मगर तिथे पोहोचली आणि मगरीने मुलीचे पाय जबड्यात धरले. ती किंचाळू लागली, काही अंतरावर उभ्या असलेल्या तिच्या भावाला तिचा आवाज ऐकू गेला.
तिचा आवाज ऐकताच भाऊ तिच्यापर्यंत पोहोचला. आपल्या बहिणीला धोका असल्याचे त्याने पाहिले आणि लगेचच कसलाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी त्याने आपला जीव पणाला लावला. तो मगरीशी लढला.
आधी त्याला मगरीला पायाने दाबायचे होते पण जेव्हा मगरीने बहिणीचा पाय सोडला नाही तेव्हा त्याने बहिणीला ओढायला सुरुवात केली.
पायाला गंभीर दुखापत झाली होती. अहवालात असे म्हटलंय की मगर फार मोठी नव्हती त्यामुळे तिने काही वेळातच मुलीचा पाय सोडला, मात्र तोपर्यंत मुलगी पडली होती आणि तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.
मुलीचा पाय मगरीने सोडताच दोघींनी तिथून पळ काढला. मुलीचे वय 9 वर्षे आणि मुलगा 19 वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुलाने आपला जीव धोक्यात घालून बहिणीचा जीव वाचवला त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय.