अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस; मिम्सवाले सांगत आहेत बजेटकडून काय आहेत अपेक्षा
अर्थसंकल्पावर सर्वत्र गंभीरपणे चर्चा सुरु असताना मात्र सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत.
मुंबईः अर्थसंकल्पावर (Budget) सर्वत्र गंभीरपणे चर्चा सुरु असताना मात्र सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार (Government) मध्यमवर्गीयांकडे (Middle Class ) दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव देशभर सुरु असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister) 2022-23 साठी आज सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाला कोणतेही सरकार असले तरी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा असते. मात्र त्या आधीच आता सोशल मीडियावर अर्थात ट्विवटरवर #Budget2022 हा हॅशटॅग वापरून आता मिम्स बनवण्यात आले आहेत. हे मिम्स बघून कोणीही आपले हसू आता थांबवू शकणार नाही. दरवेळीसारखंच हेही सरकार मध्यमवर्गींयांकडे लक्ष देणार नाही.
मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा आणि अर्थसंकल्प
या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने तर ट्वविटरवर तर #Budget2022 हा हॅशटॅगवर मिम्सचा पाऊस पडला आहे. एकीकडे लोकांना या अर्थसंकल्पाकडून खूप काही अपेक्षा असणार आहेत. तर मोठ्या पगारदार वर्ग आणखी आपला कसा पगार वाढेल म्हणून अर्थमंत्री सीतारमन यांच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसला आहे.
त्यासाठी ट्वविटरवर रोहित कुमार नावाच्या युझरने प्रत्येक अर्थसंकल्पादरम्यान कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांचे सरकार अशी पोस्ट करुन अक्षय कुमार आणि रामपाल यादव यांचा फोटो शेअर करत त्यावर ‘तू जा यहां से ये स्कीम तेरे लिए नहीं है. तु जा’ म्हणून मिम्स बनवले आहे.
Government to tax paying middle class during every budget #Budget2022 pic.twitter.com/2qxq6NjaKC
— Rohit Kumar (@RohitKu06292241) February 1, 2022
तर नारायणन एंबर यांनी तर मध्यमवर्गीय ज्या प्रकारे अर्थसंकल्पाकडे ज्या आशेने बघतात, ज्या गतीने ते अर्थसंकल्पाची अपेक्षा करतात त्यावर नारायणन एंबर याने काही सेंकदचा रामपाल यादवचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओने तर हसून लोळपोळ व्हाल असा मिम्स तयार केला आहे.
#Budget2022 expectation of middle class. #NirmalaSitharaman pic.twitter.com/QfjHIRryTQ
— Narayanan Embar (@narayananembar) January 31, 2022
राकेश आरोराने तर बाहुबली चित्रपटातील एका इमेजवर नव्या पगारदार वर्गाचे आणि करदात्यांचे मिम्स बनवले आहे ते तर हसू हसूने तुमची दमछाक होईल.
#NirmalaSitharaman will present #Budget2022 in Parliament.
Meanwhile salaried taxpayers waiting for new tax regime!?? #BudgetSession2022 #EconomicSurvey2022 pic.twitter.com/Vzurc8EzTD
— Rakesh Arora (@RakeshA70673469) January 31, 2022
तर फायनान्स मिम्स नावाच्या अकाऊंटवरून तर नव पगारदारांचा मिम्स बनवून टोक गाटले आहे. नवपगारदार वर्ग आपला पगार ऐंशीच्या स्पीडेने कसा वाढेल या आशेने ते अर्थसंकल्पाकडे कसे पाहतात याचा मिम्स बनवत त्याने बाहुबली चित्रपटातील त्या सामान्य जनतेचा फोटो वापरला आहे. त्याच्या त्या मिम्सला अधिर जणांनी त्यावर प्रतिसाद दिला आहे.
Salaried class looking at Finance Minister for increase in 80C limits ?#Budget2022 #EconomicSurvey2022 pic.twitter.com/hABJQn27fw
— Finance Memes (@Qid_Memez) January 31, 2022
Viewers waiting for FM to come income tax section pic.twitter.com/rnPo41B9A8
— Finance Memes (@Qid_Memez) February 1, 2022
या अर्थसंकल्पातून काही मोठी गोष्ट घडेल की नाही माहित नाही पण एक मात्र नक्की होणार आहे ते म्हणजे ढिगाने मिम्स तयार होणार आहेत.
पाच राज्यातील निवडणुकी दरम्यान अर्थसंकल्प सादर होत आहे. कोरोनाच्या संकट काळात देशातील प्रत्येक जण या अर्थसंकल्पाकडून काही ना काही अपेक्षा ठेऊन आहे, की आपल्यासाठी या अर्थसंकल्पात काय आहे.
FM giving budget allocation to agriculture and farmers (UP Elections ?)#BudgetWithQidMemez#BudgetSession2022 pic.twitter.com/SMEGqPYNSM
— Finance Memes (@Qid_Memez) February 1, 2022
Viewers waiting for FM to come income tax section pic.twitter.com/rnPo41B9A8
— Finance Memes (@Qid_Memez) February 1, 2022
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग चौथे बजेट सादर करत आहेत. त्या अर्थसंकल्पापेक्षा त्यांच्या लांबत जाणाऱ्या भाषणासाठी त्या खास ओळखल्या जातात. 2020-21 साली अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी आपल्याच भाषणाचा रिकॉर्ड तोडले होते, त्यावेळी त्यांनी 162 मिनिटांचे भाषण दिले होते. सध्या पाच राज्यातील निवडणूक असल्याने यावेळीही त्यांच्या भाषणाकडे देशवासियांचे लक्ष आहेत
संबंधित बातम्या