Bull Fight: बैलांच्या भांडणात लोकांची पळापळ! कुणी उलथून पडलं, कुणी वाचलं, कुणी पळून गेलं…
Dwarka Bull Fight: यात्रा असल्यामुळे इथे मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती. या गर्दीत हे बैल एकमेकांशी भांडतात आणि गर्दीत घुसतात, त्यांच्या भांडणात 2-3 लोकं सुद्धा जखमी झालेले दिसून येतायत. हे बैल भांडणात इतके व्यस्त आहेत की ते खूप दूरवर जाताना दिसतायत.
द्वारका: व्हायरल भयानी नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून एक व्हिडीओ शेअर (Video Share) करण्यात आलाय जो प्रचंड व्हायरल होतोय. प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. बैलांचे सुद्धा अनेक अनेक व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या व्हिडीओमध्ये दोन बैल (Bull Fight) एकमेकांमध्ये तुफान भांडतायत. इतके भांडतायत कि ते द्वारका मधल्या ध्वजाजीच्या यात्रेत घुसतायत. द्वारका मध्ये ध्वजाजीची एक यात्रा असते त्यातच हा प्रकार घडल्याने हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झालाय. यात्रा असल्यामुळे इथे मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती. या गर्दीत हे बैल एकमेकांशी भांडतात आणि गर्दीत घुसतात, त्यांच्या भांडणात 2-3 लोकं सुद्धा जखमी झालेले दिसून येतायत. हे बैल भांडणात इतके व्यस्त आहेत की ते खूप दूरवर जाताना दिसतायत.
ध्वज घेऊन जाणाऱ्या भाविकांवर हल्ला
गुजरातमधील द्वारका इथला व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात दोन बैलांच्या भांडणात लोक जखमी झाले आहेत. देवभूमी द्वारकाच्या बैल भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन बैल थेट फुलेकामध्ये जाताना दिसत आहेत. द्वारपालाचा झेंडा घेऊन जाणाऱ्या लोकांवर बैलाने हल्ला केला. एवढेच नव्हे तर या बैलांनी अनेकांना ठार मारले होते. बैलांना झुंजताना पाहून लोकही पळून गेले. ध्वज घेऊन जाणाऱ्या भाविकांवर हल्ला करण्यात आला.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
नागरिक जीव वाचवून पळतात
तीर्थक्षेत्र द्वारका येथील बैलांच्या भांडणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये दोन बैल भांडतांना दिसत आहे. दरम्यान, त्याच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु असतो. बैल भांडत गर्दीत घुसतात. बैलांना पाहून जमलेले नागरिक जीव वाचवून पळतात . काही नागरिक बैलांच्या पायदळी तुडवले जातात. दरम्यान, बैलांमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे काय झाले या बद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. अनेक लोकांनी यावर कमेंट्स केल्यात.