VIDEO : जेव्हा विशालकाय बैलाशी पंगा घेते एक मेंढी..! काय होतं? पाहा या व्हिडिओत

| Updated on: Dec 29, 2021 | 5:36 PM

सोशल मीडिया(Social Media)वर बरेच व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात, यात बैल (Bull)किंवा मेंढ्याशी संबंधित व्हिडिओदेखील असतात, परंतु तुम्ही क्वचितच मेंढी(Sheep)ला बैलाशी भांडताना पाहिलं असेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

VIDEO : जेव्हा विशालकाय बैलाशी पंगा घेते एक मेंढी..! काय होतं? पाहा या व्हिडिओत
bull-sheep-fight-compressed
Follow us on

तुम्ही बैल (Bull) आणि मेंढ्या(Sheep)ही पाहिल्या असतील. बैल मोठे आहेत, त्यांच्या तुलनेत मेंढ्या फारच लहान. जर आपण मेंढ्यांबद्दल बोललो तर ते एक प्रकारचे पाळीव प्राणी आहेत. सहसा लोकरीसाठी त्या पाळल्या जातात. मेंढीपालनाचा व्यवसाय हा एक जुना व्यवसाय आहे, याचा संबंध अनादी काळापासून सांगितला जातो. सामान्यतः गायींच्या प्रजननासाठी बैलांचा वापर केला जातो.

बैलाला पळून जाण्यास भाग पाडलं
सोशल मीडिया(Social Media)वर बरेच व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात, यात बैल (Bull)किंवा मेंढ्याशी संबंधित व्हिडिओदेखील असतात, परंतु तुम्ही क्वचितच मेंढी(Sheep)ला बैलाशी भांडताना पाहिलं असेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, यात एक मेंढी काहीही विचार न करता एका महाकाय बैलाशी पंगा घेतेय. मग बैलानंही आपली सर्व बुद्धिमत्ता पणाला लावली, पण तरीही मेंढी हार मानण्याचं नावच घेत नव्हती. शेवटी तिनं बैलाला पळून जाण्यास भाग पाडलंच.

अचानक बैलासमोर राहते उभी
व्हिडीओमध्ये पाहू शकताय, की मेंढी कुठूनतरी येते आणि अचानक बैलासमोर उभी राहते. यानंतर बैल आपल्या शिंगानं तिला ढकलून देतो, पण नंतर मेंढी अचानक माघार घेऊ लागते आणि थोड्या अंतरावर मागं गेल्यावर ती बैलावर हल्ला करण्यासाठी वेगानं धावते, परंतु बैल पुन्हा एकदा तिला झोडपून काढतो. मात्र, यावेळी मेंढीही हार मानण्याचं नाव घेत नाहीत आणि पुन्हा एकदा बैलाचा सामना करण्यासाठी मागं धावते. यावेळी ती बैलाला पळून जाण्यास भाग पाडते.

इन्स्टाग्रामवर शेअर
हा गंमतीदार व्हिडिओ wildfol_ नावानं इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडिओला 1 लाख 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 7,700हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केलंय. त्याचबरोबर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

Video : 48 कोटींहून जास्त वेळा पाहिला गेलाय ‘हा’ व्हिडिओ, काय आहे खास? तुमचंही डोकं चक्रावून जाईल

Viral Video : अय्यो…! वरमाला घालण्यापूर्वी वरानं घातली ‘अशी’ अट, की वधूही लाजली!

VIDEO : मैं तो आपनी मस्ती मे!, कुत्र्याचा बर्फामध्ये मस्ती करत असतानाचा सुपर क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ!