Viral: सर्वगुणसंपन्न स्कूटर! डिस्को पॅटर्न, हे तर कैच नई सिनेमा पण बघता येतो! तुम्ही पण बनवा अशीच स्कूटर
आनंदी असणं, राहणं एक सवय असते जी हळू हळू लागते. अशी लोकं आपल्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टींना रंग देत बसतात. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात एक मस्त रंगीबेरंगी स्कूटर आहे. तुम्ही म्हणाल, ह्या त्यात काय एवढं स्कूटरच तर आहेना? पण साधी स्कूटर नाही! सेक्सी स्कूटर आहे, वाढीव स्कूटर आहे!
आयुष्य हे तुम्हाला हवं तितकं रंगीबेरंगी (Colorful Life) आणि मनोरंजक (Entertaining) असू शकतं असं आम्ही नाही, आनंद महिंद्रा म्हणतात! खरंय आपल्या आयुष्यात आपण किती मजा करायची आपण किती गोष्टींचं टेन्शन घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. आनंद हा निवडला जातो, निवडता आलाच पाहिजे. जी आनंदी लोकं असतात त्यांना कुठल्याही परिस्थितीत टाका, एकटं सोडून द्या नाहीतर त्यांच्यावर कसलीही अडचण असुद्या…ती लोकं आनंदीच राहतात! आनंदी असणं, राहणं एक सवय असते जी हळू हळू लागते. अशी लोकं आपल्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टींना रंग देत बसतात. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात एक मस्त रंगीबेरंगी स्कूटर (Colorful Scooter Video) आहे. तुम्ही म्हणाल, ह्या त्यात काय एवढं स्कूटरच तर आहेना? पण साधी स्कूटर नाही! सेक्सी स्कूटर आहे, वाढीव स्कूटर आहे!
डिस्को पॅटर्नमध्ये असणारी स्कूटर
अहो या स्कूटर मध्ये सगळं आहे. बघितल्या बघितल्या आवडेल अशी आहे ही स्कूटर, काय तिचा तो थाट, काय ती लायटिंग, या स्कूटरवर गाणे वाजतात, हे तर काहीच नाही तिच्यावर बसून सिनेमा बघता येतोय मंडळी…आता बोला! लग्नात नवरदेव इतका नटत नाही जितकं या माणसाने त्याच्या स्कूटरला नटवलंय. एकदम डिस्को पॅटर्नमध्ये असणारी ही स्कूटर तुम्हालासुद्धा हवीहवीशी वाटेल. स्कूटर चालवता चालवता तुम्ही गाणं, सिनेमा बघू शकता अशा ठिकाणी स्क्रीन लावण्यात आलीये.या स्कूटरचा कलर सुद्धा एकदम रंगीबेरंगी आहे. रंगीलो स्कूटर कुणाच्याही आयुष्यात गेली तरी आयुष्य सुद्धा रंगीबेरंगी होईल अशी आहे.
Life can be as colourful and entertaining as you want it to be… #OnlyInIndia pic.twitter.com/hAmmfye0Fo
— anand mahindra (@anandmahindra) June 17, 2022
भरघोस व्ह्यूज आणि लाईक्स
उद्योगपती आनंद महिंद्रा नियमितपणे आपल्या ट्विटरवर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करतात, त्यांचे फॉलोअर्स 9 दशलक्ष आहेत. ते लोकांना प्रेरणा देतात. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करून लोकांना एक नवीन प्रेरणा दिलीये. सर्व करमणुकीच्या गरजा असलेल्या डिस्को पॅटर्नमध्ये ही वाढीव स्कूटर दर्शविली गेलीये. आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्य तुम्हाला हवे तितके रंगीबेरंगी आणि मनोरंजक असू शकते … #OnlyinIndia. या व्हिडिओला भरघोस व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.