उद्योगपती हर्ष गोएंका स्वतः विचारतायत, “मांजर कुठाय सांगा!”
हर्ष गोएंका यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये घरांची लांबच लांब रांग दिसत आहे. या सर्व घरांच्या डिझाइनमध्ये थोडासा फरक असला तरी त्यांचा रंग एकच आहे.
आरपीजी ग्रुपचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. ते अनेकदा ट्विटरवर माहिती देणाऱ्या गोष्टी शेअर करतात. अनेकदा ते क्विझशी संबंधित अशा गोष्टीही शेअर करतात. आता त्यांनी ट्विटरवर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो शेअर करत लोकांना ते सोडवण्याचे आव्हान दिले आहे. हर्ष गोएंका यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये घरांची लांबच लांब रांग दिसत आहे. या सर्व घरांच्या डिझाइनमध्ये थोडासा फरक असला तरी त्यांचा रंग एकच आहे. त्या घरांच्या चित्रात एक हुशार मांजर लपलेली असते. ती मांजर तुमच्या डोळ्यासमोर आहे पण तरीही पटकन दिसत नाही.
हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जर तुम्ही सतर्क असाल तर तुम्हाला 10 सेकंदात मांजर सापडेल.’ तर 642 हजारांहून अधिक लोकांनी त्याच्या या फोटोला लाईक केले आहे. हे चॅलेंज करण्यासाठी लोक पूर्ण मन लावून काम करत आहेत.
If you are observant, you will find the cat in 10 seconds… pic.twitter.com/fisVmjJWFl
— Harsh Goenka (@hvgoenka) January 22, 2023
जर तुम्हाला 10 सेकंदात ती मांजर सापडली असेल तर तुम्ही स्वत:ला जीनियस समजू शकता. जर तुम्हाला ते अजूनही सापडलं नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला त्या मांजरीचे नेमके ठिकाण सांगतो. चित्र काळजीपूर्वक बघा. चित्राच्या वरच्या उजव्या बाजूला मांजर घरांच्यामध्ये लपून बसलेली असते. आता ते तुम्ही पाहिलंच असेल.