झोप उडवणारं कॅलेंडर व्हायरल… ऑक्टोबर महिना फक्त 20 दिवसांचाच, बाकीचे दिवस गेले कुठे?; कधीचं आहे कॅलेंडर?

सोशल मीडियावर आता रोज काही ना काही गोष्ट व्हायरल होत असते. आणि व्हायरल झालेली प्रत्येक गोष्ट खास आणि गूढ असल्याचं सांगितलं जातं. आताही एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ते एक कॅलेंडर आहे. आता या कॅलेंडरवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. असं काय आहे या कॅलेंडरमध्ये?

झोप उडवणारं कॅलेंडर व्हायरल... ऑक्टोबर महिना फक्त 20 दिवसांचाच, बाकीचे दिवस गेले कुठे?; कधीचं आहे कॅलेंडर?
October 1582Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 6:53 PM

जग गोल आहे. आणि या जगाचा इतिहास कोटी, अब्जो साल जुना आहे. या जगातील अनेक रहस्य अजून खुले झालेले नाहीत. हे जग रहस्यमय गोष्टींनी भरलेलं आहे. काही रहस्य अंगाचा थरकाप उडवणारे आहेत. तर काही रहस्य आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. असेच एक आश्चर्यकारक रहस्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे 440 पूर्वी म्हणजे 1582मध्ये जगात एका महिन्यात 10 दिवस कमी होते. तो महिना होता ऑक्टोबरचा. सोशल मीडियावर 1582मधील ऑक्टोबर महिन्याचं एक कॅलेंडर व्हायरल झालं आहे. एका इन्स्टाग्रामरने त्याच्या रहस्यावर भाष्य केलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ असला तरी यातील ही गोष्ट अत्यंत रोचक आहे.

इंस्टाग्रामवर @real_ruths नावाच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आजची तारीख चुकीची आहे, असं नाव या व्हिडीओला दिलेलं आहे. 1582 पासून ते आतापर्यंतच्या ज्या काही तारखा आहेत, त्यात 10 दिवस कमी आहेत. आपण सर्वजण 11 दिवस आधी पुढे आहोत. मी त्याचा तुम्हाला पुरावा देऊ शकतो, असं हा इन्स्टाग्रामर म्हणाताना दिसतोय. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील कॅलेंडर उघडले तर 1582च्या ऑक्टोबर महिन्याला पाहून थक्क व्हाल. या कॅलेंडरमध्ये 4 ऑक्टोबरनंतर थेट 15 ऑक्टोबर ही तारीख दाखवण्यात आली आहे. त्यातील 10 दिवस एकदम गायब झाले आहेत. हे 10 दिवस कुठे गेले मला माहीत नाही. पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅलेंडर चेक करू शकता, असं हा इन्स्टाग्रामर म्हणतोय.

कारण ऐकून थक्क व्हाल…

तुम्ही मोबाईलमधील कॅलेंडर चेक कराल तर 1582 या वर्षात जाल तर ऑक्टोबर महिन्यातील 4 तारखेनंतर थेट 15 ऑक्टोबरची तारीख दाखवली आहे. याचं कारण कुणाला माहीत नाही. पण या काळात जगभरात ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला जात होता. हे कॅलेंडर 1582मध्ये पोप ग्रेगोरी-8 यांच्या नावाने तयार करण्यात आलं होतं. तर 1582मध्ये ज्युलिअस सीझरच्या नावाने ज्यूलियन कॅलेंडर बनवण्यात आलं होतं. त्यावेळी चार वर्षात एक लीप ईयर होतं. त्यावेळी पृथ्वीच्या भ्रमणाची जी तुलना केली जात होती, त्या हिशोबाने कॅलेंडरमध्ये 10 दिवस अधिकचे जोडले जात होते. कॅलेंडरमधील ही कमतरता हटवण्यासाठी ग्रेगोरियन कॅलेंडर बनवण्यात आलं. पोप ग्रेगोरी यांनी जेव्हा नवीन कॅलेंडर तयार केलं, तेव्हा त्यांनी या कॅलेंडरमधील 10 दिवस कमी केले. त्यामुळेच 4 ऑक्टोबर नंतर थेट 15 ऑक्टोबर दाखवण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Real Truth (@realt_ruths)

यूजर्स काय म्हणाले?

realt_ruths नावाच्या अकाऊंटवर हा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 11.7 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 5 लाख 24 हजार वेळा या व्हिडीओला लाइक करण्यात आलं आहे. या व्हिडीओवर यूजर्समध्ये एकमत नाहीये. यूजर्स आपआपली विविध मते व्यक्त करताना दिसत आहेत. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करायची होती. म्हणून 1582 मध्ये 10 दिवस कमी करण्यात आले होते, असं एकाने म्हटलंय. तर ही त्यावेळची चूक आहे. फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला एका यूजर्सने दिला आहे. तर हे कॅलेंडर ग्लिच आहे. फार विचार करू नका, असं एकाने म्हटलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.