Viral: सिगारेटच्या पॅकेजवर प्रयोग करून कॅनडा करतंय निस्ता धूर! नवीन आयडिया, जगभर चर्चा…
कॅनडा हार्ट अँड स्ट्रोक फाऊंडेशनचे सीईओ डग रॉथ म्हणाले, "कॅनडामध्ये आता सिगारेटसाठी जगातील सर्वात मजबूत आरोग्यविषयक सूचना देणारी यंत्रणा उपलब्ध होणार आहे. ही घातक उत्पादने आहेत आणि या उपायांमुळे धूम्रपान कमी होण्यास मदत होईल."
कॅनडा पुन्हा एकदा धुम्रपानाच्या (Cigarettes) बाबतीत जगासमोर मोठे उदाहरण ठेवणार आहे. प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारे (Health Warning) लिहिणारा कॅनडा (Canada) हा जगातला पहिला देश ठरणार आहे. दोन दशकांपूर्वी कॅनडाने तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगवर ग्राफिक फोटो आणि चेतावणी संदेश लिहायला सुरुवात केली. यानंतर जगातील अनेक देशांमध्ये हे घडले.आतासुद्धा कॅनडा सिगारेटच्या पॅकेजवर नवीन प्रयोग करतंय ज्यामुळे सध्या ते जगभर चर्चेत आहे.
पाकिटावर लिहिलेल्या मेसेजकडे लोक लक्ष देत नाहीत
कॅनडाचे मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनता मंत्री कॅरोलिन बेनेट म्हणाले, “सध्या लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांवर लिहिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. या संदेशांमुळे त्यांचे नावीन्य आणि त्यांचा प्रभाव कमी झाला आहे या गोष्टीकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे,” असं सांगून ते पुढे म्हणाले, प्रत्येक तंबाखू उत्पादनांना आरोग्यविषयक चेतावणी दिल्यास हे आवश्यक संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अनेकदा तरुणच पहिल्यांदा सिगारेटचं सेवन करतात. ते पॅकेजवरील माहितीला बायपास करतात किंवा त्यांच्या ते लक्षात येत नाहीअशा परिस्थितीत तरुणांपर्यंत हा संदेश पोहचणं फार गरजेचं आहे.”
नवीन नियम 2023च्या उत्तरार्धात लागू होईल
कॅरोलिन बेनेट यांनी सांगितले की, 2023 च्या उत्तरार्धात या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची योजना आखली जाते. याअंतर्गत आपण प्रत्येक सिगारेटवर “प्रत्येक पफमध्ये विष” असा संदेश लिहिणार आहोत. या प्रस्तावाचे स्वागत करताना कॅनडा हार्ट अँड स्ट्रोक फाऊंडेशनचे सीईओ डग रॉथ म्हणाले, “कॅनडामध्ये आता सिगारेटसाठी जगातील सर्वात मजबूत आरोग्यविषयक सूचना देणारी यंत्रणा उपलब्ध होणार आहे. ही घातक उत्पादने आहेत आणि या उपायांमुळे धूम्रपान कमी होण्यास मदत होईल.”
Canada is proposing that written health warnings be printed on individual cigarettes, the first country in the world to do so, a federal minister said on Friday. https://t.co/OqxmWahh7y
— Reuters Health (@Reuters_Health) June 11, 2022
सर्वजण या निर्णयाचे स्वागत करत आहेत
कॅनेडियन कॅन्सर सोसायटीचे वरिष्ठ धोरण विश्लेषक रॉब कनिंगहॅम म्हणाले, ‘हे जगभर एक आदर्श घालून देणार आहे. आपण सहजपणे दुर्लक्ष करू शकत नाही असा हा इशारा असेल. ते प्रत्येक धूम्रपान करणाऱ्या पर्यंत पोहोचेल. कॅनडाच्या आकडेवारीवर लक्ष दिलं तर 2020 मध्ये देशातील 40 लाखांहून अधिक लोक रोज किंवा अधूनमधून धूम्रपान करणारे होते.