गांजा मारणाऱ्यांची चांदी! या कामासाठी प्रोफेशनल स्मोकर्सला मिळणार 88 लाखांचं पॅकेज
अर्जदार हा "कैनबिस पेशेंट" म्हणेजच "गांजाचा पेशंट" असावा, अशी अटही या नोकरीत आहे.
गांजा मारणे हा आपल्याकडे, भारतात अपराध आहे. हा अपराध रोखण्यासाठी भारतात मोहिमा राबविल्या जातात. यात पकडलं तर शिक्षा होते आणि गुन्हेगाराला तुरुंगात जावे लागते. परंतु इतर देशांमध्ये गांजा मारणे हा गुन्हा नसून ते कायदेशीररित्या वैध मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ,’प्रोफेशनल स्मोकर्स’ची नोकरीही उपलब्ध आहे. गांजा मारण्यासाठी, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी बक्कळ पॅकेज दिले जात आहे.
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, एक कंपनी गांजा मारण्याची नोकरी देणार आहे. यात गांजाची गुणवत्ता तपासण्यासाठी वार्षिक 88 लाख रुपये वेतन दिले जाणार आहे. जर्मनीच्या कॅनामेडिकल कंपनीने Cannabis Sommelier म्हणजेच गांजा तपासण्याची भरती सुरू केलीये.
गांजाची गुणवत्ता तपासण्यासाठी कंपनी गांजा मारण्यात माहिर असलेल्या कर्मचाऱ्याच्या शोधात आहे. ही कंपनी ‘वीड एक्स्पर्ट’च्या शोधात आहे. ही कंपनी औषधासाठी गांजा विकते.
यामुळेच कंपनी गांजाची विक्री करणारा, त्याची गुणवत्ता तपासणारा आणि धूम्रपान करणारा आणि त्याची गुणवत्ता तपासणारा कर्मचारी शोधत आहे.
अर्जदार हा “कैनबिस पेशेंट” म्हणेजच “गांजाचा पेशंट” असावा, अशी अटही या नोकरीत आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडे जर्मनीत कायदेशीररित्या गांजा मारण्याचा परवानाही असावा.