‘वर्क फ्रॉम होम’ दरम्यान तुमचीही अशी अवस्था होऊ शकते, पाहा मजेशीर व्हिडीओ
एका मांजराचा असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे तुम्ही सध्या घरातून काम अर्थात वर्क फ्रॉम होम करत असाल तर तुम्हाला अनेकदा एनर्जीची कमतरता किंवा आळस येत असेल. अशा लोकांसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला मांजरीचा एक व्हिडीओ रिलेट होऊ शकतो.
मुंबई : सोशल मीडियावर अनेक मजेशीर आणि हैराण करणारे व्हिडीओ (Funny Video) तुम्हाला पाहायला मिळतील. अनेकदा तुम्ही स्क्रीन स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला प्राण्यांचे व्हिडीओही पाहायला मिळत असतील. अशात काही व्हिडीओ असे असतात की ते तुमच्या मनाला आनंद देऊन जातात. इंटरनेटवर मांजरांच्या व्हिडीओची (Cat Video) भरमार असते. एका मांजराचा असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे तुम्ही सध्या घरातून काम अर्थात वर्क फ्रॉम होम करत असाल तर तुम्हाला अनेकदा एनर्जीची कमतरता किंवा आळस येत असेल. अशा लोकांसाठी इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करण्यात आलेला मांजरीचा एक व्हिडीओ रिलेट होऊ शकतो.
या व्हिडीओमध्ये एक मांजर दिसतं आणि एका वृत्तानुसार या मांजरीचं नाव नाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मांजर डोळे मिटून टेबलवर बसले आहे आणि त्या मांजरासमोर पेपरचा मोठा गठ्ठा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला असं वाटतं की या मांजराला काम करण्यात कुठलाही रस नाही. तुम्ही घरातून काम करता का? असा प्रश्न कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विचारण्यात आला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ nala_cat या पेजवर पाहू शकता
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोबतच अनेक लोक या व्हिडीओला स्वत:शी रिलेट करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण हा व्हिडीओ nala_cat या पेजवर पाहू शकता. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. सोबतच लोकांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या जात आहेत. सोबतच अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना हा व्हिडीओ टॅग करत आहेत.
‘नाला… तुमच्यासारखंच मी घरातून काम करतो!’
या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये पाहिलं तर एका यूजरने म्हटलं आहे की, हा नाला, तुमच्यासारखंच मी घरातून काम करतो. एकाने म्हटलं की, प्रेमळ मांजर, सुंदर नाला. एकाने नालाला काम करुन थकल्याचं म्हटलंय, सोबतच एक किस करणारी इमोजी टाकली आहे. या व्हिडीओमध्ये हजारो इमोटिकॉनही पाहायला मिळत आहेत. ज्याला शेअर करताना लोक आपली रिअॅक्शनही देत आहेत.
इतर बातम्या :