चित्ता चालकाजवळ येऊन उभा, चालकाने दरवाजा उघडला आणि…थरकाप!
हा जंगलातला सर्वात चपळ असतो. होय, वेगाने चालणारे प्राणीही चित्त्याच्या वेगाच्या पुढे मंदावतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जंगल सफारीदरम्यान काही पर्यटक चित्त्यासोबत मस्ती करताना दिसतायत. हे दृश्य पाहून अनेकजण संतापले.
मुंबई: चित्ता हा जंगलातील एक भयानक भक्षक आहे. हा जंगलातला सर्वात चपळ असतो. होय, वेगाने चालणारे प्राणीही चित्त्याच्या वेगाच्या पुढे मंदावतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जंगल सफारीदरम्यान काही पर्यटक चित्त्यासोबत मस्ती करताना दिसतायत. हे दृश्य पाहून अनेकजण संतापले. काही युजर्सनी या पर्यटकांना मूर्ख म्हटले, तर काहींनी चित्त्याने हल्ला केल्यावर कळलं असतं असं म्हटलं. आणखी एका युजरने म्हटले आहे की, वाघ किंवा सिंहासमोर असे काही करण्याची चूक करू नका.
या व्हायरल व्हिडिओमध्ये नामिबियामध्ये जंगल सफारी दरम्यान एका गटाला भुकेल्या चित्ताची कशी भेट होते हे दिसत आहे. जीपवरील पर्यटकाच्या हातातील मांस पाहून चित्ता त्याच्या दिशेने येतो. तो इतक्या पटकन येतो की व्हिडीओ पाहून कुणाचाही थरकाप उडेल. थोड्या वेळाने हा चित्ता आपल्या मागच्या पायावर उभा राहतो आणि गाडीच्या दारावर चढतो. तो ड्रायव्हरच्या इतका जवळ आहे की हे पाहून कोणत्याही हृदयाचे ठोके वाढतील. जेव्हा जीपचा ड्रायव्हर चित्तासमोर गाडीचा दरवाजा उघडतो आणि मांसाचा तुकडा त्याच्या दिशेने फेकतो तेव्हा आश्चर्यकारक घटना घडते.
These tourists on a safari had a close encounter with a hungry cheetah ? pic.twitter.com/c62ODFlWaM
— NowThis (@nowthisnews) June 8, 2023
जंगलातला हा दुर्मिळ व्हिडीओ 8 जून रोजी ट्विटर हँडलवरून पोस्ट @nowthisnews करण्यात आला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, नामिबिया सफारीमध्ये जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना भुकेल्या चित्ताचा सामना करावा लागला. खरं तर, हा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या जूनमधील आहे. 34 वर्षीय मॅग्डालेना रिझकोवस्का ने नामिबियातील विंडहोकजवळ सहली दरम्यान हा व्हिडीओ चित्रित केलाय.