Video: 2 चाकांवर 2 किलोमीटरपर्यंत व्हिली, चैन्नईच्या रिक्षा ड्रायव्हरचा कारनामा, व्हिडीओ गिनीज बुकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट
या रिक्षाचालकाने विश्वविक्रम केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या रिक्षाचालकाचं नाव नोंदवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ जुना आहे, मात्र गिनीज बूकने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पुन्हा या रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आपल्या आजूबाजूला अनेक प्रतीभावान लोक वावरत असतात, पण त्याची आपल्याला माहिती नसते, आता रिक्षावाल्यांचंच बघा ना, रिक्षाचालकांमध्येही एक अद्भूत प्रतीभा असू शकते असं तुम्हाला वाटतं का? काही दिवसांपूर्वी लावणी करणाऱ्या एका रिक्षा चालकाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अजून एक रिक्षाचालक फेमस होतो आहे. फक्त फेमसच नाही, या रिक्षाचालकाने विश्वविक्रम केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या रिक्षाचालकाचं नाव नोंदवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ जुना आहे, मात्र गिनीज बूकने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर पुन्हा या रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ( Chennai driver drove three wheeler on two wheels for 2 2 km sets record )
गिनीज बुकने त्यांच्या पेजवरून शेअर केलेला व्हिडिओ हा जुना आहे, पण आता हा व्हिडिओ पुन्हा लोकप्रिय होत आहे. यामध्ये जगतीश मणी नावाची व्यक्ती 2.2 किमी अंतरासाठी आपला ऑटो दोन चाकांवर चालवत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एपिक ऑटो-रिक्षा साइड व्हीली. भारतातील चेन्नईचे रिक्षाचालक जगतीश एम.मणी यांच्याकडे हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या अधिकृत पेजवरुन सुमारे 3 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात हे पाहिले जाऊ शकते की, जगतीश मणी तीन नव्हे तर दोन चाकांवर पिवळ्या रंगाची ऑटो चालवत आहेत. आता सांगायचं झालं तर, बरेच लोक आपला ऑटो दोन चाकांवर चालवतात. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, ते हे लांब अंतरासाठी असं करू शकत नाहीत. पण जगतीश मणिने आपला ऑटो फक्त दोन चाकांवर 2.2 किलोमीटर चालवला. म्हणूनच त्याचा स्टंट पाहून लोकांना आश्चर्य वाटले.
हेही वाचा:
Video: समुद्राच्या लाटेने टायर कसा फुटला पाहा, लहान मुलांच्या कारनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Know This: अशी आई, जी बाळाला दूध पाजते आणि मरते, बाळांचं पोट भरण्यासाठी मृत्यूला कवटाळणारी आई