Viral : नाही मिळाले वही-पुस्तक म्हणून गाडीच्या काचेवर सुरू केला अभ्यास, पाहा हृदयस्पर्शी Photo
Child emotional video : सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल (Viral) होत आहे. या छायाचित्रात (Photo) एक मूल गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
Child emotional video : शिक्षणातून सर्व काही साध्य होऊ शकते. त्यामुळेच अन्न, वस्त्र आणि निवारा यासह शिक्षण आणि आरोग्य या मानवाच्या मुलभूत गरजा झाल्या आहेत. शिक्षण नसेल तर काहीच साध्य होऊ शकत नाही. मात्र दुर्दैवाने अजूनही अनेक ठिकाणी मुलांना शिक्षण मिळत नाही. काही ठिकाणी लहान मुले ज्यांना शिकण्याची हौस असते मात्र परिस्थितीमुळे त्यांना काहीच करता येत नाही. ते हतबल होतात. अनेक जण अक्षरश रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करतात, असे आपण अनेकवेळा ऐकले आणि वाचले असेल. आता अशाच एका विषयासंबंधीची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो व्हायरल (Viral) होत आहे. या छायाचित्रात (Photo) एक मूल गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. एखाद्या मुलाच्या घरात लाइट नसेल तर ज्याप्रमाणे रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करतो, हे तसेच उदाहरण म्हणावे लागेल.
वही-पुस्तके घेण्याइतकेही पैसे नाहीत
एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुलगा भाजी विकताना अभ्यास करताना दिसत आहे. या छायाचित्रात मूल गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. अनेक मुलांकडे शिक्षणासाठी पैसे नसतात. अनेक मुलांकडे त्यांच्या अभ्यासासाठी वही-पुस्तके घेण्याइतके पैसेही नसतात. त्यामुळे त्यांना आहे त्या साधनांवर अभियास करावा लागतो.
लोक होत आहेत भावुक
काही लोकांना वेळ आणि परिस्थितीमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर लोक भावुक होत आहेत. चित्रात तुम्ही बघू शकता, की मूल गाडीच्या काचेवर इंग्रजी वर्णमालेतील ABCD अक्षरे लिहित आहे. एबीसीडी हे मूल एवढ्या उत्कटतेने लिहित आहे, की सोशल मीडिया यूझर्स त्याचे कौतुक करत आहेत. मात्र व्यवस्थेवर नाराजीही व्यक्त करत आहेत.
ट्विटर अकाऊंटवरून शेअर
हे छायाचित्र सर्वप्रथम आयपीएस अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. हा फोटो शेअर करताना त्यांनी हृदयाला स्पर्श करणारी कॅप्शन लिहिली आहे. छायाचित्रासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे, ते ठिकाण आणि वेळ पाहत नाहीत.’ सोशल मीडियावर हा फोटो समोर आल्यानंतर त्याला खूप पसंती मिळत आहे. याला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.
जिन्हें शिक्षा प्राप्त करने की चाह होती है, वे जगह और वक्त नहीं देखते। pic.twitter.com/7gHSTYRrfH
— Arif Shaikh (@arifhs1) February 15, 2022
आणखी वाचा :