Video | लहान मुलांची चिखलात धम्माल, व्हिडीओ पाहून आयपीएस ऑफिसरला आठवलं बालपण

सध्या मोठ्या माणसांना त्यांच्या बालपणाची आठवण करुन देणारा असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलांनी केलेली मस्ती प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करुन देणारी आहे.

Video | लहान मुलांची चिखलात धम्माल, व्हिडीओ पाहून आयपीएस ऑफिसरला आठवलं बालपण
SMALL CHILDREN PLAYING IN MUD
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 4:37 PM

मुंबई : बालपण प्रत्येकालाच आवडतं. मुक्तपणे खेळावं, हुंदडावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. याच इच्छेपोटी प्रत्येक मोठा माणूस आपलं निघून गेलेलं बालपण नव्याने जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनची की काय एखाद्या लहान मुलाचा किंवा मुलीचे बालपण पाहून मोठी माणसं हुरळून जातात. लहान मुलांच्या धम्माल, मस्तीचे व्हिडीओ पाहिले की मोठ्या माणसांना चांगलाच आनंद होतो. सध्या मोठ्या माणसांना त्यांच्या बालपणाची आठवण करुन देणारा असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बच्चे कंपनीने केलेली मस्ती प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करुन देणारी आहे. (children playing in mud on road video went viral on social media)

चिखलामुळे रस्ता गुळगुळीत

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लहान मुलं चिखलामध्ये खेळत आहेत. रस्त्यावर झालेल्या चिखलामध्ये ही मुलं कशाचीही चिंता न करता हुंदडत आहेत. पाण्यामुळे हा रस्ता चिखलाने माखल्याचे दिसतेय. सगळीकडे चिखल झाल्यामुळे हा रस्ता चांगलाच गुळगुळीत झाला आहे. रस्ता गुळगुळीत झाल्यामुळेच ही मुलं रस्त्यावरील चिखलात खेळत आहेत.

लहान मुलं खेळतायत रस्त्यावर घसरगुंडी

या रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट जंगल दिसते आहे. या घनदाट जंगलात ही मुलं रस्त्यावर घसरगुंडी खेळत आहेत. रस्त्याच्या उंचावर बाजूने येऊन ही मुलं रस्त्याच्या उताराकडे घसरत जात आहेत. त्यांचा हा खेळ अतिशय मजेदार वाटतो आहे. चिखलात खेळताना या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. चिखलात घेळतानाचा या मुलांना झालेला आनंद हा पाहण्यासारखा आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा (Rupin Sharma) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. खेळणाऱ्या लहान मुलांना पाहून अनेकांना त्यांचे बालपण आठवल्यामुळे लोक या व्हिडीओला रिट्विटसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नदीच्या किनाऱ्यावर लोक थांबले, मध्येच जमीन खचली, पुढे काय झालं एकदा बघाच !

Video | चार माणसांसोबत महिलेची ऑनलाईन बैठक, मध्येच झाला मोठ्ठा घोळ, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : जंगलात मस्ती करणारा हा छोटा हत्ती देतोय सामाजिक संदेश, व्हिडीओ पाहून नेटकरीही चकित

(children playing in mud on road video went viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.