Chinese Toddler | इतका गोंडस व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल! पुन्हा पुन्हा बघाल…
हे व्हिडीओ इतके छान असतात की ते लोकांकडून पुन्हा पुन्हा पाहिले जातात. तुम्हालाही असे खूप व्हिडीओ लक्षात असतील ज्यात लहान मुलं असतात आणि जे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक छोटासा गोंडस मुलगा बास्केट बॉल खेळतोय. होय.
मुंबई: लहान मुलं फार गोंडस असतात. कधी काय करतील काहीच सांगता येत नाही. लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ इतके छान असतात की ते लोकांकडून पुन्हा पुन्हा पाहिले जातात. तुम्हालाही असे खूप व्हिडीओ लक्षात असतील ज्यात लहान मुलं असतात आणि जे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक छोटासा गोंडस मुलगा बास्केट बॉल खेळतोय. होय. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष लहान मुलं तर काहीही खेळू शकतात. पण हा व्हिडीओ बघा.
बास्केटबॉल सर्वात जास्त अमेरिकेत खेळला जाणारा खेळ आहे. हा व्हिडीओ चीन मधील आहे. ड्रिब्लिंग तर तुम्हाला माहीतच असेल. बास्केट बॉल मधलं ड्रिब्लिंग आपण फक्त एकाच हाताने केलेलं पाहिलंय. पण हे छोटंसं बाळ चक्क आपल्या दोन्ही हाताने ड्रिब्लिंग करतंय. हा व्हिडीओ इतका गोंडस आहे की तुम्ही वारंवार हा व्हिडीओ बघाल.
Y’all, this baby is really dribbling two basketballs at once… pic.twitter.com/hjqfUu4cMp
— Rex Chapman?? (@RexChapman) July 30, 2023
या व्हिडिओच्या सुरवातीला गोंडस बाळ आधी दोन बास्केटबॉल उचलतं आणि मग दोन हातांमध्ये दोन बॉलचं ड्रिब्लिंग सुरु करतं. बराच वेळ तो हे ड्रिब्लिंग करतो. त्याचा बॅलन्स जातच नाही. नंतर तर तो अगदी स्टाईल मध्ये उभा राहतो. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.