या फुलदाणीचा किस्सा लई भारी! कुणीतरी हिच्याबद्दल अफवा पसरवली, किंमत हिची कायच्या काय झाली
जर एखाद्या गोष्टीचा चुकून लिलाव झाला आणि त्या बदल्यात मोठी रक्कम मिळाली तर? अशीच एक गोष्ट सध्या व्हायरल होतीये.
अनेक वेळा असं होतं जेव्हा इतिहासाशी संबंधित गोष्टींचा लिलाव केला जातो तेव्हा त्या बदल्यात मोठी रक्कम मिळते. लिलाव होणाऱ्या गोष्टीचं महत्त्वही खूप जास्त आहे. पण कल्पना करा, जर एखाद्या गोष्टीचा चुकून लिलाव झाला आणि त्या बदल्यात मोठी रक्कम मिळाली, तर ते खूपच धक्कादायक असेल. अशीच एक गोष्ट सध्या व्हायरल होतीये. एकदम साधारण फुलदाणी लिलावात 74 कोटी रुपयाला विकली गेलीये. आहे ना आश्चर्यकारक?
ही घटना फ्रान्समधील एका शहरातील आहे. चिनी फुलदाणी अगदी सामान्य किमतीची होती. एका व्यक्तीने आपल्या घरातील काही वस्तू बाजारात लिलावासाठी आणल्या. तेव्हा हा सर्व प्रकार घडला.
आजीच्या मृत्यूनंतर एका माणसाला त्याच्या घरातून अनेक वस्तू सापडल्या आणि यात एका फुलदाणीचा समावेश होता. त्या माणसाला ते खरं तर सामान्य किंमतीत विकायचे होते.
पण ही फुलदाणी इतक्या चांगल्या कोरीव कामापासून बनलेली होती की लोकांना ती काहीतरी भलतीच भारी वाटू लागली. ही एक चिनी फुलदाणी होती जी अगदी सामान्य किंमतीची होती.
बाजारात कुणीतरी ही फुलदाणी मध्ययुगीन काळातील आहे अशी अफवा पसरवली. या फुलदाणीत ड्रॅगन आणि ढग कोरलेले होते. पण ही अफवा पसरल्यावर ती विकत घेण्यासाठी लोक पुढे येऊ लागले आणि मग तिचा लिलाव झाला.
लिलावगृहाचे अध्यक्ष जीन पियरे यांच्या मते लोकांना ही फुलदाणी १८ व्या शतकातीलच वाटली. सुमारे तीनशे ते चारशे लोकांना ही फुलदाणी खरेदी करायची होती.
अशा गोंधळात फुलदाणी प्रत्यक्ष किमतीपेक्षा हजारोपट अधिक किमतीला विकली गेली. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीने ही खरेदी केली तोही चीनचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
फुलदाणीची किंमत दीड लाख रुपये निश्चित करण्यात आली होती, पण ती ७४ कोटींपर्यंत लांबली आणि या किंमतीवर या व्यक्तीने ती खरेदी केलीये. कदाचित फुलदाणीचे सत्यही त्याला ते विकत घेतल्यानंतरच कळले असावे.