Video | मैदानात उतरण्यापूर्वी कोचने खेळाडूच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ एकदा पाहाच
. सध्या टोक्यो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकदरम्यानचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिला खेळाडूच्या प्रशिक्षकाने कानशीलात लगावल्या आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्या टोक्यो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिकदरम्यानचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिला खेळाडूच्या प्रशिक्षकाने कानशीलात लगावल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (coach slaps athletes in tokyo olympics video went viral on social media)
व्हिडीओमध्ये काय आहे ?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जर्मनीची ज्युदो प्लेयर Martyna Trajdos दिसत आहे. ट्राजोस यांचा सामना असल्यामुळे त्या उत्साहात मैदानावर उतरण्यास सज्ज आहेत. या दरम्यान ट्राजोस यांच्याकडे त्यांचा कोच आला आहे. या कोचने Martyna Trajdos यांचे कॉलर पकडले आहे. तसेच कॉलर पकडून कोच Martyna Trajdos यांना गदागदा हालवतो आहे. नंतर हा कोच एवढ्यावर थांबलेला नाही. तर त्याने Martyna Trajdos यांना दोन चार कानशिलात लगावल्या आहेत. या सर्व प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही एक धार्मिक प्रार्थना, कोचचा काही संबंध नाही
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच वेगवेगळ्या चर्चासुद्धा रंगल्या आहेत. त्यानंतर कोणतीही अफवा पसरु नये म्हणून @martyna_trajdos यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी व्हिडीओमधील दिसत असलेला प्रकार हा एक धार्मिक प्रार्थना आहे. कोणत्याही सामन्याच्या आधी ही प्रार्थना केली जाते. यामध्ये त्यांच्या प्रशिक्षकाचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
पाहा व्हिडीओ :
A czo tu się odpoliczkowało w ogóle?! pic.twitter.com/mX2r9rMMTA
— Mischa Von Jadczak (@michaljadczak) July 27, 2021
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. असा प्रकारे खेळाडूचा उत्साह वाढवला जातो का ? असे एका नेटकऱ्याने विचारले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.
इतर बातम्या :
Video | कारचालकाच्या मस्तीची दुचाकीस्वारांना शिक्षा, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
(coach slaps athletes in tokyo olympics video went viral on social media)