‘तीन वेळा अजून चावणार, नवव्यांदा तू नाही वाचणार’, सापाने धरला तरुणाचा पिच्छा, आतापर्यंत 6 वेळा केला नागाने दंश

Cobra Bites : या युगात अशा दाव्यांवर विश्वास ठेवणे तर्काला धरून नाही. पण काही गोष्टी अतर्क्य असतात. त्यातीलच हे वृत्त. नागाने एका तरुणाचा पार पिच्छा धरला आहे. त्याने त्याला आतापर्यंत 6 वेळा चावा घेतला. तर आता स्वप्नात येऊन...

'तीन वेळा अजून चावणार, नवव्यांदा तू नाही वाचणार', सापाने धरला तरुणाचा पिच्छा, आतापर्यंत 6 वेळा केला नागाने दंश
नाग लागला मागे
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 5:46 PM

विज्ञानयुगात काही अतर्क्य गोष्टी घडतात. त्याविषयीचे दावे करण्यात येतात. सोशल मीडियाच्या जगात तर इतके खोटे दावे समोर येतात की त्यावर विश्वास तरी कसा ठेवावा असा प्रश्न पडतो. पण उत्तर प्रदेशातील एका तरुणाचा जीवच धोक्यात आला आहे. एका नागाने त्याचा पिच्छा धरला आहे. हा नाग त्याला एकदा, दोनदा नाही तर 6 वेळा चावला आहे. प्रत्येक वेळी डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नाने या युवकाला जीवनदान मिळाले. पण आता तर या सापाने स्वप्नात येऊन…

शनिवार-रविवारीच घेतला चावा

विकास दुबे असे या तरुणाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील फतेहपूर जवळील सौरा या गावचा रहिवाशी आहे. तो 24 वर्षांचा आहे. गेल्या 34 दिवसांत त्याला सापाने 6 वा वेळा चावा घेतला आहे. या नागाने त्याला शनिवारी आणि रविवारीच दंश केला आहे. साप चावणार, याचा त्याला अगोदरच अभास होत असल्याचा त्याचा दावा आहे. प्रत्येकवेळी डॉक्टरांनी त्याला वाचवले आहे. पण एकाच व्यक्तीला सहा वेळा एकच साप कसा चावू शकतो, यावरुन डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबिय, गावकरी हैराण आहेत.

हे सुद्धा वाचा

आता तू नाही वाचणार

तिसऱ्यांदा जेव्हा हा साप चावला. त्याच रात्री हा नाग स्वप्नात आल्याचा दावा दुबे याने केला आहे. त्यानुसार या सापाने त्याला नऊ वेळा चावणार असल्याचे सांगितले. आठ वेळ तर तू वाचशील, पण नवव्यांदा ज्यावेळी तुला चावेल, त्यावेळी कोणतीची शक्ती, तांत्रिक अथवा डॉक्टर तुला वाचवू शकणार नाही. मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईल, असे साप स्वप्नात म्हटल्याचा दावा विकास दुबे याने केला आहे.

गाव बदलले, पण नागाने नाही सोडला पिच्छा

हा नाग त्याला शनिवार अथवा रविवारीच दंश करतो. तिसऱ्यांदा जेव्हा या सापाने चावा घेतला. त्यावेळी डॉक्टरने त्याला गाव आणि घर सोडून दुसरीकडे राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे हा तरुण त्याच्या मावशीच्या घरी गेला. पण तिथे पण या सापाने त्याला दंश केला. त्यानंतर हा तरुण त्याच्या काकाच्या घरी गेला. तिथे पण सापाने त्याला 6 व्या वेळा दंश केला. या घटनेने तरुणासोबत त्याचे कुटुंबिय भेदरले आहे.

पहिल्यांदा 2 जून 2024 रोजी हा नाग विकास याला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चावला होता. त्याला तात्काळ जवळच्या डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारानंतर घरी आल्यावर 10 जून रोजी नागाने त्याला दंश केला. 17 जून रोजी त्याला सापाने चावा घेतला. तेव्हापासून आतापर्यंत 6 वेळा नागाने त्याला दंश केल्याचा दावा करण्यात येत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.