Video : तीन दिवसांपासून कानात शिरलं होतं झुरळ! डॉक्टरांनाही कळलं नाही काय झालं, अखेर…
न्यूझीलंड(New Zealand)मधल्या ऑकलंड(Auckland)मधल्या एका व्यक्तीला नुकताच हा वाईट अनुभव आला. त्याच्या कानात झुरळ (Cockroach) असल्याचं डॉक्टरांना आढळल्यानं तो माणूस घाबरला.
मानवी शरीरात अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. न्यूझीलंड(New Zealand)मधल्या ऑकलंड(Auckland)मधल्या एका व्यक्तीला नुकताच हा वाईट अनुभव आला. त्याच्या कानात झुरळ (Cockroach) असल्याचं डॉक्टरांना आढळल्यानं तो माणूस घाबरला. 40 वर्षीय झेन वेडिंगला शुक्रवारी सकाळी पोहल्यानंतर त्याचा डावा कान बंद झाल्याचं जाणवलं. त्याच दिवशी संध्याकाळी तो त्याच्या पलंगावर झोपला आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याचा कान बंद झाला होता. इतकंच नाही तर कानात मुंग्या येत असल्यानं त्यानं डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवलं.
त्रास होत राहिला
न्यूझीलंड हेराल्डच्या रिपोर्टनुसार, झेन वेडिंग 8 जानेवारीला डॉक्टरांकडे गेली, जिथे त्यांना अँटीबायोटिक्स देण्यात आले आणि तिला हेअर ड्रायरनं कान कोरडे करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं. पण त्या सल्ल्याचा उपयोग झाला नाही आणि त्याला खूप त्रास होत राहिला. दोन रात्री कसाबसा त्रास सहन केल्यानंतर त्यानं तज्ज्ञांना भेटण्याचं ठरवलं. त्यानं कानाच्या दवाखान्यात अपॉइंटमेंट घेतली.
डॉक्टर स्वतःच पडले गोंधळात
तिथं डॉक्टरांनी त्याला गाठ असू शकते, असं सांगितलं. पण नंतर कानात जंत असू शकतो, असं सांगितले. मिस्टर वेडिंग म्हणाले, की डॉक्टरांचं म्हणणं ऐकून तो खुर्चीवरून उडालाच. डॉक्टर स्वतःच गोंधळात पडले होते. दरम्यान, वेडिंगनं फेसबुकवर एका पोस्टमध्ये झुरळाचा फोटो शेअर केला. त्यानं पोस्टला कॅप्शन दिलं, ‘आज नव्या डॉक्टरांकडे सेकंड ओपिनियनसाठी गेलो आणि त्यांनी माझ्या कानातून झुरळ काढलं. तीन दिवस ते माझ्या कानात होतं.’
‘असं कधी पाहिलं नाही’
मिस्टर वेडिंग यांनी न्यूझीलंड हेराल्डला सांगितलं, की यामुळे तो शारीरिकदृष्ट्या आजारी आहे आणि मला वाटलं की माझा कानाचा पडदा फाटला आहे. झुरळ काढणाऱ्या महिला डॉक्टर म्हणाल्या, ‘मी हे यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. मी त्याबद्दल वाचलं होतं, पण पाहिलं नव्हतं.’