Condom Addiction: बापरे! काय? फ्लेवर्ड कंडोम्सच्या मदतीने नशा? कंडोमची विक्री अचानक वाढल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले

फ्लेवर्ड कंडोमची विक्री अचानक वाढलीये. आधी ही विक्री कमी प्रमाणात होती पण आता माल दुकानात आल्या आल्याच त्याच दिवशी संपतो असा प्रकार घडतोय. या फ्लेवर्ड कंडोम्सच्या मदतीने इथली तरुणाई नशा करते असं उघड झालंय.

Condom Addiction: बापरे! काय? फ्लेवर्ड कंडोम्सच्या मदतीने नशा? कंडोमची विक्री अचानक वाढल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले
Condom Addiction Increase In condom salesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 12:57 PM

तरुणाई मध्ये नशेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. आता नशा आवाक्यात आणण्यासाठी तर ठिकठिकाणी नशामुक्ती केंद्र (De-Addiction Centre) सुद्धा चालविण्यात येत आहेत. लोकं इतके नशेच्या आहारी जातात की त्यासाठी अगदी ते कोणताही मार्ग अवलंबू शकतात. नशेच्या बाबतीत वेळोवेळी नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. जसं की नशा कफ सिरप, पेंट, गोंद आणि आफ्टरशेव्ह, नेल पॉलिश अशा गोष्टींनी सुद्धा केले जाते. या गोष्टी आधी प्रकाशझोतात आलेल्या नव्हत्या त्या वेळोवेळी येत गेल्या. अगदी झंडू बाम ब्रेडला लावून खाणारी नशेडी माणसं सुद्धा आपल्याकडे आहेत या सुद्धा वाचण्यात आलेल्या गोष्टी आहेत. अशीच एक बातमी येतीये पश्चिम बंगालच्या दुर्गापूर मधून, इथे फ्लेवर्ड कंडोमची विक्री (Increase In Condom Sales) अचानक वाढलीये. आधी ही विक्री कमी प्रमाणात होती पण आता माल दुकानात आल्या आल्याच त्याच दिवशी संपतो असा प्रकार घडतोय. या फ्लेवर्ड कंडोम्सच्या (Flavored Condoms) मदतीने इथली तरुणाई नशा करते असं उघड झालंय.

तो ‘नशा’ करण्यासाठी नियमितपणे कंडोम खरेदी करतो

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे राहणाऱ्या काही विद्यार्थी आणि तरुणांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री अचानक वाढल्याने स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. अहवालानुसार, दुर्गापूरच्या विविध भागांमध्ये, जसे की दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिती आणि मुचीपारा, सी झोन ​​आणि ए झोनमध्ये गर्भनिरोधक साधनाचा वापर वाढला आहे. दुर्गापूरमध्ये एक-दोन दिवसांत कंडोम शेल्फ बंद आहेत,ते का बंद आहेत हे सांगताना या अधिकाऱ्याने हा खुलासा केलाय. एका स्थानिक दुकानदाराने कुतुहलाने त्याचा रोजचा ग्राहक असलेल्या एका तरुणाला विचारले असता त्याने दिलेल्या उत्तरामध्ये तो ‘नशा’ करण्यासाठी नियमितपणे कंडोम खरेदी करतो. असे समोर आले आहे.

कंडोम अ‍ॅडिक्शन म्हणजे काय?

न्यूज रिपोर्ट्स नुसार, दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी कंडोमचा माल आला की दिवसाला 3-4 पाकिटं विकली जात होती पण आता माल येताच तो संपतो. पण प्रश्न हा आहे की ही तरूण मंडळी नेमकी ‘नशेखोरी’ साठी त्याचा वापर कसा करतात? एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, शाळेची केमेस्ट्री विषयाच्या शिक्षिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरम पाण्यात कंडोम दीर्घकाळ भिजवल्याने मोठ्या ऑर्गनिक मोल्युक्युल्सचे अल्कोहोलयुक्त कम्पाऊंडमध्ये विघटन झाल्यामुळे नशा होते. हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या धीमन मंडल याने देखील दिलेल्या माहितीनुसार, कंडोममध्ये अ‍ॅरोमॅटिक कम्पाऊंड्स असतात त्यांचे अल्कोहल मध्ये रूपांतर होते. हेच कम्पाऊंड dendrites glue मध्ये आढळतात. अनेकजण dendrites glue देखील अ‍ॅडिक्शनसाठी वापरतात.

पदार्थाचा गैरवापर करणार्‍यांवर गुन्हा दाखल करू शकत नाही

अलीकडील काही अहवालांमध्ये कफ सिरप, पेंट, गोंद आणि आफ्टरशेव्ह यासह substance abuseच्या यादीमध्ये कंडोम जोडले गेले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी अद्याप या विषयावर भाष्य केलेले नाही कारण त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की ते पदार्थाचा गैरवापर करणार्‍यांवर गुन्हा दाखल करू शकत नाहीत कारण भारतीय दंड संहितेमध्ये या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतेही विशिष्ट कायदे नाहीत.

Non Stop LIVE Update
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...