Video : विमानात तुंबळ मारहाण, लोकलमधल्या भांडणांना लाजवतील अशी भांडणं!, पाहा व्हीडिओ…
विमानातील काही लोकांमध्ये हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतेय. फ्लाइटमध्येच लाथा बुक्क्यांनी झालेली मारहाण सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
मुंबई : लोकलमध्ये घडणारे अनेक किस्से चवीने ऐकले वाचले जातात. या लोकलमधली भांडणं तर वर्ड फेमस… पण अशी भांडणं फक्त लोकलमध्येच होतात, असं नाही… तर ती विमानातही होतात. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण अश्या विमानातल्या भांडणांचा एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. यात विमानातल्या भांडणाचा अनुभव घेता येईल. तुंबळ हाणामारीचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल (video viral) होत आहे. या व्हीडिओमध्ये विमानातील काही लोकांमध्ये हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतेय. फ्लाइटमध्येच लाथा बुक्क्यांनी झालेली मारहाण सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या विमानातील एका कर्मचाऱ्याने ही भांडण (conflict video) मिटवण्याचा प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी झाला नाही. या घटनेचा व्हीडीओ सध्या बराच चर्चेत आहे.
व्हायरल व्हीडिओ
विमानातील काही लोकांमध्ये हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतेय. फ्लाइटमध्येच लाथा बुक्क्यांनी झालेली मारहाण सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या विमानातील एका कर्मचाऱ्याने ही भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी झाला नाही. या घटनेचा व्हीडीओ सध्या बराच चर्चेत आहे.ही घटना यूकेच्या मँचेस्टरहून नेदरलँड्सच्या अॅमस्टरडॅमला जाणाऱ्या KLM एअरलाइनच्या फ्लाइटमध्ये घडली आहे.फ्लाइटमध्ये काही मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती आहे. दोन्ही गटात सुरू असलेलं हे भांडण काही वेळात लाथा-बुक्क्यामध्ये बदललं. यात एक प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.
Nice flight to dam today x pic.twitter.com/4FqulwXN2d
— Maya Wilkinson (@MayaWilkinsonx) May 5, 2022
असाच विमानातील मारहाणीचा एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. भरविमानात एका प्रवाशाला माईक टायसनने बदड बदड बदडलंय. या प्रवाशाच्या तोंडावर दे दणादण मुक्के माईक टायसन मारत होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ही घटना 20 एप्रिलची असल्याचं सांगितलं जातंय. विमान प्रवासावेळी एक प्रवाशी माईक टायसनसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. विमानात जिथं माईक टायसन बसलेला, त्याच्या पुढच्या बाजूलाच बसलेल्या प्रवाशाला माईक टायसननं मारहाण केली. पुढे बसलेला हा प्रवासी सारखा माईक टायसनशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र माईक टायसनला बोलण्याची जराही इच्छा नव्हती. तो बराच वेळ दुर्लक्ष करत होता. त्यानंतर माईकला राग येऊ लागला. आलेला राग मनात धरुन माईक तरिही जागेवरच बसून होता. मात्र प्रवाशाचं बोलणं काही थांबेना!
BREAKING: Mike Tyson seemed to lose his cool on a #JetBlue flight on #Wednesday night.
TMZ reports states that the man assaulted was annoying #Tyson, took a selfie with him and kept trying to talk to the 55-year-old #fighter as he sat behind him.
#miketyson #News #fighting pic.twitter.com/ch9f7Mg3yI
— Chaudhary Parvez (@ChParvezAhmed) April 22, 2022