‘पिछे देखो पिछे, पिछे तो देखो’ फारुख अब्दुल्लांच्या भाषणावेळी मागे नेमकं काय चाललंय?

शशि थरुरंचा संसदेतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. संसदेतील ते ज्या पद्धतीने बोलत बसले होते, त्यावर लोकांनी असे काही मीम्स बनवले की फेसबूक, ट्विटरवर त्यांच्या त्या मीम्सचा पाऊस पडला आहे.

'पिछे देखो पिछे, पिछे तो देखो' फारुख अब्दुल्लांच्या भाषणावेळी मागे नेमकं काय चाललंय?
लोकसभेत फारुख अब्दुल्लांचे भाषण सुरु असताना सुप्रिया सुळे आणि शशि थरुर बोलत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 5:33 PM

नवी दिल्लीः शशि थरुर त्यांच्या इंग्रजीच्या आणि त्यांच्या शब्दसंग्रहालयाबद्दल सगळ्या देशाला माहिती आहेत. ते बोलत असताना किंवा एकाद्या मुद्यावर चर्चा करत असताना नेहमीच्या शब्दापेक्षा वेगळा शब्द ते आपल्या भाषणात नाही तर वक्तव्यामध्ये वापतात, आणि मग त्यांनी मांडलेल्या मुद्यापेक्षा त्यांच्या त्या एखाद्या शब्दाचीच चर्चा सुरु होते. कालपासून शशि थरुरंचा संसदेतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. संसदेतील ते ज्या पद्धतीने बोलत बसले होते, त्यावर लोकांनी असे काही मीम्स बनवले की फेसबूक, ट्विटरवर त्यांच्या त्या मीम्सचा पाऊस पडला आहे.

काँग्रेसचे खासदार शशि थरुर (Congress MP Shashi Tharoor) यांचा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे, तो लोकसभेतील एका सत्रातील आहे. लोकसभेच्या त्या सत्रात जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचे भाषण सुरु आहे, आणि त्यांच्या मागच्या बाजूला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे बसल्या आहेत, त्या शशि थरुर यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहेत, तर शशि थरुरही सुप्रिया सुळे यांच्यासोबत हसत हसत त्यांच्याबरोबर बोलत आहेत. संसदेतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मीम्सचा (Mims) पाऊस पडला आहे, अजूनही शशि थरुरांवर मीम्स बनवणं सुरुच आहे.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल ( Viral Video ) झाला आहे, त्यामध्ये फारुख अब्दुल्ला उभा लोकसभेच्या सदनात उभा राहून बोलत आहेत. आणि याच वेळी थरुर आणि सुप्रिया सुळे आपापसामध्ये चर्चा करत आहेत. समोर फारुख अब्दुलांचे भाषण सुरु आहे, त्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या मागे थरुर आणि सुप्रिया सुळे हसत हसत आपापल्यामध्ये बोलत आहेत.

यावेळी सुप्रिया सुळे त्यांना काही तरी सांगत आहेत, आणि त्यांच्या बोलण्याकडे एकाग्रतेने ऐकत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ झाला आहे, आणि त्याच्या बॅकग्राऊंडला पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं वाजत आहे. हे गाणं वाजत असतानाचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला आहे.

लोकसभेत जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा चालू होती, त्यावेळी शशि थरु आणि सुप्रिया सुळे आपापसात चर्चा करतानाचा त्यांचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद्य झाला आहे. ट्विटरवर, सोशल मीडियावर थरूर आणि सुप्रिया सुळे यांचे संसद बोलत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या त्यांच्या व्हिडिओवर नेटिझन्सनी मीम्स आणि जोक्स तयार केले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे फारुख अब्दुल्लांच्या चर्चेपेक्षा मात्र शशि थरुर आणि सुप्रिया सुळे यांच्या चर्चेची आहे.

संबंधित बातम्या

युक्रेनवरून परतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विद्यापीठाचे मोफत ई-लर्निंग सुरू; मंत्री देशमुखांच्या हस्ते उदघाटन

Sanjay Raut : प्रचंड गर्दीतून वाट काढत भावानं भावाचा हात धरला! राऊत बंधूंमधील भावकी कॅमेऱ्यात कैद

Aurangabad | कोकणवाडी चौकात तुफान हाणामारी, औरंगाबादेत पुन्हा राडा, 7-8 तरुण गंभीर जखमी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.