कोरोना संकटातही हॉटेलने दाखवली दरियादिली, कर्मचाऱ्यांना 7 दिवसांच्या सहलीवर पाठवलं

कोरोना काळात हॉटेलपासून अनेक बड्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पगार करणंही त्यांना शक्य झालं नाही. मात्र अमेरिकेतील एक हॉटेल या काळात चर्चेचा विषय ठरलं आहे. या हॉटेलने आपला कर्मचाऱ्यांसाठी फक्त लक्झरी ट्रिप दिली नाही तर त्यांना 8 दिवसांची सुट्टीही दिलीय.

कोरोना संकटातही हॉटेलने दाखवली दरियादिली, कर्मचाऱ्यांना 7 दिवसांच्या सहलीवर पाठवलं
Hotel Employee on trip
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 12:43 PM

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या आयुष्यात मोठा परिणाम पाहायला मिळतोय. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. तर काही कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केलीय. कोरोनामुळे अनेक्यांच्या नोकरीवर गदा आलीय, त्यामुळे लाखो तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलीय. कोरोना काळात हॉटेलपासून अनेक बड्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पगार करणंही त्यांना शक्य झालं नाही. मात्र अमेरिकेतील एक हॉटेल या काळात चर्चेचा विषय ठरलं आहे. या हॉटेलने आपला कर्मचाऱ्यांसाठी फक्त लक्झरी ट्रिप दिली नाही तर त्यांना 8 दिवसांची सुट्टीही दिलीय. (Owner of the Ramon House Hotel in the US sent the staff on a trip to Vegas)

मिळालेल्या माहितीनुसार हे हॉटेल अमेरिकेतील केंटकी राज्यातील लुइसविले इथं आहे. रेमन हाऊस नावाच्या हॉटेल चालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना वेगासच्या ट्रिपवरुन घेऊन जाण्याचा निर्णय घेतलाय. या ट्रिपच्या माध्यमातून हॉटेल चालकाने कर्मचाऱ्यांचे एकप्रकारे आभार व्यक्त केले आहेत. हॉटेलने आपल्या फेसबुक पेजवर ही मोठी घोषणा केली आहे. तसंच काही फोटोही शेअर केले आहेत. ते हॉटेल एक आठवड्यापर्यंत बंद राहणार असल्याचं या हॉटेल चालकाने जाहीर केलंय. त्यांनी 7 जुलैला लिहिलं आहे की, क्षमा करा, आम्ही या आठवड्यात बंद आहोत. कारण आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड कष्ट आणि मेहनतीने काम केलं आहे आता त्यांना ब्रेक हवा आहे.

या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, आम्ही त्यांना वेगासला घेऊन जाण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा हॉटेलमध्ये परत येऊ. तसंच त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह एक फोटो शेअर केलाय. सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर झाल्याबरोबर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलीय. तसंच हजारो लाईक्सही या पोस्टला मिळत आहेत. अनेकांनी असंही म्हटलंय की हॉटेलच्या मालकाच्या या दरियादिलीमुळे आम्ही प्रसन्न झालो.

संबंधित बातम्या :

कोरोनापासून बचावासाठी मास्क गरजेचा, मुंबई पोलिसांची समजावण्याची पद्धत सोशल मीडियावर व्हायरल

Video | बलुचिस्तानमध्ये ‘तेरी मिट्टी’ गाण्याचा बोलबाला, अली बुगाटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Owner of the Ramon House Hotel in the US sent the staff on a trip to Vegas

HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.