व्हिडीओ बघून लोकं म्हणाले, “हाच की खरा रोमान्स!” Viral Video
देशाच्या अनेक भागांत मान्सून दाखल झालाय. एका जोडप्याचा पावसात डान्स करतानाचा एक मनमोहक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅफिक आणि इतर प्रवाशांना न घाबरता आणि त्रास न देता व्यस्त रस्त्यावर तरुण आणि तरुणी मनमोकळेपणाने नाचताना दिसत आहेत.
मुंबई: खरं तर पावसाळा हा प्रेमासाठी प्रचंड फेमस आहे. पाऊस असला की लोकांना वातावरण रोमँटिक वाटायला लागतं. सगळ्यांच्या आतले कवी जागे होतात. देशाच्या अनेक भागांत मान्सून दाखल झालाय. एका जोडप्याचा पावसात डान्स करतानाचा एक मनमोहक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॅफिक आणि इतर प्रवाशांना न घाबरता आणि त्रास न देता व्यस्त रस्त्यावर तरुण आणि तरुणी मनमोकळेपणाने नाचताना दिसत आहेत.
पावसाळ्यात या जोडप्याने केला रोमान्स
काही लोकांनी ही इंटरनेटवर आजवर असणारी सर्वात चांगली गोष्ट वाटली. तर, काही जण असे करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, असेही म्हटले आहे. ऑनलाइन डेटिंग आणि कॅज्युअल हुकअपच्या या युगात त्यांच्यातील केमिस्ट्री आणि प्रेम नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करत आहे, अनेकांनी याला खरे प्रेम म्हटले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “या जोडप्याच्या स्वभावावरून ते एकमेकांवर किती प्रेम करतात हे दिसून येते. एखाद्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करण्याची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची भावना आजही जगातील सर्वोत्तम भावना असल्याचे व्हिडिओमधून दिसून येतंय.
इंदौर की एक तस्वीर यह भी !pic.twitter.com/0DMWnl7tAs
— काश/if Kakvi (@KashifKakvi) June 25, 2023
“जेव्हा खरं प्रेम असतं तेव्हा ते असं असतं”
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, ‘आजकाल किशोरवयीन मुलांना रोमान्सच्या नावाखाली क्लब आणि पबमध्ये फिरणे, मद्यपान करणे आणि एकत्र धुम्रपान करणे, फॅन्सी आणि महागड्या डिनर डेटवर जाणे आवडते. पण, खरं प्रेम नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतं. ऑनलाइन शेअर केल्यापासून या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “जेव्हा खरं प्रेम असतं तेव्हा ते असं असतं”.