Video | भर चौकात जोडीची करामत, तरुण-तरुणीचा मजेदार डान्स व्हायरल

आजच्या तरुणाईची गोष्टच काहीशी वेगळी आहे. सध्या तर एका जोडीने भर रस्त्यात सोबत डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | भर चौकात जोडीची करामत, तरुण-तरुणीचा मजेदार डान्स व्हायरल
couple dance on road
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:56 AM

मुंबई : आजकालचे तरुण-तरुणी कधी काय करतील हे सांगता येत नाही. काही तरुण आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी भर रस्त्यात फुल भेट देतात. तर काही तरुणी आपल्या प्रियकरासाठी रस्त्यावरच आय लव्ह यू म्हणून मेसेज लिहतात. आजच्या तरुणाईची गोष्टच काहीशी वेगळी आहे. सध्या तर एका जोडीने भर रस्त्यात सोबत डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून नेटकरी चांगलेच आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (couple dancing on road funny video went viral on social media)

बाईकवर बसून तरुण-तरुणीचा डान्स

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक कपल दिसत आहे. हे कपल स्पोर्ट बाईकवर बसून कुठेतरी जात आहे. मात्र, मध्येच रस्त्यावर सिग्नल लागल्यामुळे त्यांना चौकात थांबावं लागलं आहे. त्यानंतर काही सूचत नसल्यामुळे हे कपल सोबतच दुचाकीवर बसून मजेदार डान्स करत आहे. सुरुवातील समोर बसलेला तरुण हात बाहेर करत डान्स करतोय. त्याचा डान्स पाहून तरुणाच्या मागे बसलेली तरुणीसुद्धा कंबर आणि हात हालवत तरुणासोबत डान्स करत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

हा सुंदर व्हिडीओ पाहून नेटकरी आनंदी झाले आहेत. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर bestvirallvideos या व्हिडीओवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | कुत्र्यांवर महिलेचं भलतंच प्रेम, पण खेळताना मध्येच घोळ झाला, पाहा नेमकं काय घडलं ?

Video | स्विमिंग पूलमध्ये महिला आरामात झोपली, जवळ येताच कुत्र्याने केला भलताच कारनामा, एकदा पाहाच !

Video | भावाच्या लग्नात बहिणीचा जलवा, पाहुण्यांसमोर स्टेजवर केला धमाकेदार डान्स

(couple dancing on road funny video went viral on social media)