Viral : …आणि जोडपं पडलं चिखलाच्या खड्ड्यात! नेमकं घडलं तरी काय? नेटिझन्स म्हणतायत…

कझाकिस्तान(Kazakhstan)मधल्या एका जोडप्याचा फोटोशूटचा प्रयत्न चित्रीकरणादरम्यान माती(Mud)च्या ढिगाऱ्यात पडल्यानंतर व्हायरल (Viral) झाला. या फोटोंनी सोशल मीडिया (Social Media) यूझर्सचं लक्ष वेधून घेतलं.

Viral : ...आणि जोडपं पडलं चिखलाच्या खड्ड्यात! नेमकं घडलं तरी काय? नेटिझन्स म्हणतायत...
कझाकिस्तानमधील जोडप्याचं फोटोशूट
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 2:14 PM

अलिकडे लग्नसोहळे त्यातले फोटोशूट आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असतात. आपल्या विवाहसोहळ्याला अधिक खास बनवण्यासाठी जोडपे अगदी जोखमीच्या पोझचा अवलंब करतात, ज्यामुळे ते फोटो अगदी वेगळे दिसतील. आता हेच पाहा, कझाकिस्तान(Kazakhstan)मधल्या एका जोडप्याचा फोटोशूटचा प्रयत्न चित्रीकरणादरम्यान माती(Mud)च्या ढिगाऱ्यात पडल्यानंतर व्हायरल (Viral) झाला. या फोटोंनी सोशल मीडिया (Social Media) यूझर्सचं लक्ष वेधून घेतलं. त्यावर कमेंट्सही देताना दिसून येतायत.

…आणि पडले खड्ड्यात कझाकिस्तानच्या जोडप्यानं घराबाहेर फोटोशूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसला. त्यांचे छायाचित्रकार अस्कर बुमागा यांनी इन्स्टाग्रामवर कमिला आणि मुरात झुरायेव यांचे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये मुरात आणि कामिला हे जोडपं कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. मात्र त्यादरम्यानच ते चिखलाच्या खड्ड्यात पडले. फोटोंमध्ये कामिला ऑफ-शोल्डर गाऊन घातलेली दिसते तर मुरात काळ्या रंगाचा सूट घातलेला दिसतो. जरी हे जोडपं मातीच्या ढिगाऱ्यात पडलं असलं तरी हसताना दिसतंय. काही फोटोंमध्ये हे जोडपं मातीच्या ढिगाऱ्यातून उठण्याचा प्रयत्न करताना दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by ????? ?????? (@bumagaz)

अनोखं काहीतरी हे फोटो शेअर केल्यापासून 9000हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या चित्रांनी नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलंय. यात कमेंट्सही ते देतायत. एकानं म्हटलंय, की ही एक छान कल्पना आणि चांगलं काम आहे. दुसर्‍या यूझरनं लिहिलंय, की मला आश्चर्य वाटतं की आता अशा फोटोंची पुनरावृत्ती कोण करेल?, दुसर्‍या नेटिझननं लिहिलंय, “सर्वोत्तम आणि अनोखे.”

Maut Ka Kuan : स्टंटमॅनसारखं ‘मौत का कुआं’मध्ये धावतायत हे लोक, आयएएस अधिकाऱ्यानं शेअर केला Video

Viral Video : माकडाला पकडायचा होता पाण्याचा बुडबुडा, मग काय झालं? पाहून तुम्हालाही येईल हसू

VIDEO : देव तारी त्यास कोण मारी! तीन वाहनांमध्ये भयानक अपघात… मात्र, पुढे असे काही घडले की, पाहुण प्रत्येकजण झाला आश्चर्यचकित

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.