हाय का आता! चालत्या स्कूटीवर रोमान्स
पण व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलगा एका व्यस्त रस्त्यावर स्कूटी घेऊन जात आहे आणि मुलगी त्याच्या पुढ्यात बसलेली आहे.
अनेकदा सोशल मीडियावर रोमान्सचे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होतात. पण कधी कधी हे इतकं धोकादायक ठिकाणी केलं जातं की त्यासाठी लोक आपला जीव पणाला लावतात. असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक जोडपं चालत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसतंय.
खरं तर हा व्हिडिओ अनेक युजर्सनी शेअर केला आहे. एका युट्युब चॅनेलवरही तो शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ लखनौमधील एका ठिकाणचा आहे, मात्र लखनौमध्ये कोणत्या ठिकाणी आहे याची पुष्टी झालेली नाही. पण व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलगा एका व्यस्त रस्त्यावर स्कूटी घेऊन जात आहे आणि मुलगी त्याच्या पुढ्यात बसलेली आहे.
ही मुलगी मुलाकडे तोंड करून दोन्ही हातांनी त्याला घट्ट पकडून बसली आहे. मुलगी त्याला पुन्हा पुन्हा किस करत असते. आश्चर्याची बाब म्हणजे स्कूटीचा वेगही खूप होता. समतोल थोडाही बिघडला असता तर दोघेही कोसळले असते. त्यांना गंभीर दुखापत झाली असती.
हा सगळा प्रकार मागे धावत असलेल्या एका दुचाकीस्वाराने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे काहीजण म्हणू लागले. अशा प्रकारचा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही.